अकरा कोटी त्राणांशी लाख नानाजी देशमुख प्रकल्पासाठी २०२०-२१ निधी मंजूर

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा नवीन १ फेब्रुवारी २०२१ रोजीचा शासन निर्णय gr पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण शासन निर्णय gr तसेच इतर या योजनेसंबंधी च्या गोष्टींची माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल, तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. हवामानास अतिसंवेदनशील असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील ४२१० गावे तसेच विदर्भातील ९३२ अशी मिळून ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीसाठी सुमारे चार हजार कोटी अंदाजित रुपयांचा हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून निवडलेल्या गावांचे सूक्ष्म नियोजन,आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

Contents hide

नानाजी देशमखु कृषी संजीवनी दिनांक १२ मे २०२० रोजी कृषी ताई परिसंवाद ( वेबिनार )

कार्यक्रमात विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे PDF पहा

शासन निर्णय-

  • या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या अकरा कोटी त्राणांशी लाख निधीच्या वितरणाकरिता प्रकल्प संचालक   नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मंबई यांना नियंत्रक अधिकारी व वित्त विशेषज्ञ यांना या संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • मागील वर्ष्यातील आर्थिक प्रलंबित देयके आणि सामुदायिक कामांची प्रलंबित देयके यासाठी सदर मंजूर निधीचा विनियोग शासन करणार आहे.

सदर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शासन निर्णय GR पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

पूर्वसंमती यादी कशी पाहायची ?

या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल, तर त्या योजनेचे अनुदान तुम्हाला प्राप्त करण्यासाठी प्रथम शासनाच्या पूर्वसंमतीची गरज असते, आणि अर्ज समाप्ती नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्वसमंती यादी लागतात. आणि त्या याद्यांमध्ये शेतकरी लाभार्त्याला त्याचेव नाव आहे का नाही हे पाहणे आवश्यक असते. या यादीत नाव असल्यास शेतकऱ्याचा अर्ज शासनाकडून मंजूर झालेला असतो ,आणि तो सदर योजनेच्या अनुदानास पूर्णपणे पात्र असतो. म्हणून जर तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर नक्कीच हि यादी पाहणं तुम्हाला अत्यावश्यक असणार आहे. तर ती यादी स्वतः कशी पाहायची हे पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पाहू शकता अन्यथा खालील लिंकवर क्लिक करू डिरेक्ट पडफ मध्ये ती यादी तुम्ही पाहू शकता. सन २०१८-१९ ची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

तुमचे गाव या योनजेत समाविष्ट आहे का ? पहा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत राज्यातील समाविष्ट असणाऱ्या गावांची यादी चा महाराष्ट्र राज्य शासन जी. आर, पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि तुमच्या शंकांचे निरसन करा.

कृषी विभाग
महाराष्ट्र शासन
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA),
३० अ/ब, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर,
कफपरेड,
मुंबई ४००००५.
Email: pmu@mahapocra.gov.in
Phone: ०२२-२२१६३३५१

Leave a Comment

Translate »