किसान रेल योजना ऑनलाइन बुकिंग 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण किसान रेल योजना या शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या योजनेची माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकारने ७ ऑगस्ट २०२११ रोजी किसान रेल्वे योजनेची घोषणा केलेली आहे. या चर्चेला अंमलात आणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण जी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यांचा शेतमाल वेळेवर योजल्या बाजारपेठेत पोहचावी. या उद्देशाने किसान रेल योजना सुरू केली आहे. किसान रेल योजनेंतर्गत शेतकर्‍यांसाठी एक रेल्वे चालविली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल म्हणजेच भाजीपाला, फळे किंवा इतर शेतीचा धान्य बाजारपेठेत पोहचवणे अधिक सोपे होईल.

शेतकरी रेल्वेचे योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनाचा शेतमाल जास्त वेळ खराब न होऊ देता, ताज्या अवस्थेत भाज्या फळे इत्यादी मंडइपर्यंत पोहचवणे, आणि यापासून शेतकऱ्याला चांगल्या मालाचा चांगला मोबदला मिळून देणे हे आहे.

किसान रेल्वे योजना २०२१ ऑनलाईन रजिस्ट्रेशन –

या योजनेअंतर्गत चालू होणारी शेतकऱ्यांसाठी चालू होणारी रेल्वे सेवा हि भारतीय रेल्वे महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर स्टेशन पर्यंतचालू होणार आहे. हि सेवा ७ ऑगस्ट २०२१ रोजी प्रथमच किसान रेल्वे योजना चालवणार आहे. महाराष्ट्रातील देवळाली ते दानापूर स्थानक हे अंतर १५१९ किमी आहे, जे ३२ तासांत व्यापले जाईल. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यास देशातील प्रत्येक शेतकरी पात्र असणार आहे.

प्रधानमंत्री किसान रेल योजनेचे मुख्य उद्दीष्ट –

सद्य स्थिती पाहता, आपल्या देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालेल आहे, केंद्र सरकारने ही समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे रखडली आहे. शेतकर्‍यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांचा माल म्हणजेच पिके, भाजीपाला आणि फळे योग्य बाजारात वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाहीत, त्यामुळे त्यांचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे देशातील शेतकऱयांना भारी नुकसान सोसावे लागले आहे.
ही समस्या केवळ कोरोनाव्हायरस काळातच नाही, तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हि बाब पण शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने किसान रेल योजना २०२१ सुरू केली गेली आहे.

या योजनेचा खूप मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारची हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारी आहे. किसान रेलमार्गाद्वारे शेतकरी आपली पिके, भाजीपाला, फळे वेळेवर मंडईमध्ये नेण्यास सक्षम होतील. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि शेतकरी खूप मोठ्या शेतमाल नासाडीच्या संकटातून वाचणार आहे.

किसान रेल योजना २०२१ चे शेतकऱ्यांना लाभ –

  • किसान रेल योजनेचा सर्वाधिक लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना होणार आहे. कारण हि राज्ये किसान रेल योजनेच्या पहिल्या रेल मार्गावर येत आहेत.
  • २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, हा केंद्र शासनाचा या योजनेमागचा ध्यास आहे.
  • या योजनेंतर्गत कोल्ड स्टोरेजसह शेतकरी उत्पादनांच्या वाहतुकीची चांगली व्यवस्था केली जाणार आहे.
  • किसान रेल ही एक प्रकारची खास पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल म्हणजेच फळे, भाज्या, धान्य इत्यादी शेतमाल योग्य पद्धतीने नेण्याची व्यवस्था केली जाईल.
  • या रेल सेवेमार्फत शेतकऱ्याचा माल हा थेट मंडई पर्यंत पोहोचवला जाईल.

किसान रेल्वे योजना २०२१ ऑनलाईन रजिस्ट्रेशन –

किसान रेल्वे योजने २०२१ चा लाभ घेऊ इच्छुक शेतकर्‍यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण ही योजना नवीन असून रेल्वे विभाग किंवा केंद्र सरकारकडून ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी अद्याप कोणतेही पोर्टल तयार केले गेलेले नाही. सदर योजनेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग ची माहिती केंद्र सरकार किंवा भारतीय रेल्वे विभागाने जाहीर केली असता, ती माहिती आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचवू.

Leave a Reply