केंद्र सरकार शेती आधुनिक यंत्र ८०%अनुदान स्माम किसान योजना २०२१ online अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण स्माम (SMAM) किसान योजना २०२१ ची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे शेतकरी स्माम योजना, उद्दिष्ट्य, लाभ, पात्रता, कागदपत्रे, संपर्क(टोलफ्री क्रमांक) इत्यादी सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या लेखात नक्कीच मिळतील. जर तुम्हाला तुमच्या शेतीच्या आधुनिकिकरणासाठी करावयाचे असेल आणि यंत्रासाठी अनुदान मिळवायचे असेल तर हा लेख नक्कीच शेवटपर्यंत नक्कीच वाचा.

SMAM शेतकरी योजना २०२१

देशातील शेतकरी बांधवांना सहजपणे शेतीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने स्माम किसान योजना २०२१ सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक उपकरणे आवश्यक आहेत, म्हणून या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकरी आधुनिक शेतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी ५० ते ८० टक्के अनुदान आर्थिक सहाय्य स्वरूपात दिले जाते. या आर्थिक मदतीमुळे शेतकरी सहजपणे कृषि उपकरणे खरेदी करू शकतील. त्याचा फायदा आधुनिक पद्धतीने शेती करून कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना होईल.

ही योजना देशातील सर्व राज्यांतील पात्र शेतकर्‍यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि महिला शेतकरी देखील या योजनेंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकारची शेती मशिनरी योजना शेतकर्‍यांसाठी सुरू केली, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्रअनुदान मिळू शकेल.या अनुदानाचा शेतकर्‍यांना शेती आधुनिकीकरणासाठी भरपूर फायदा होणार आहे.

स्माम किसन योजनेचे उद्दिष्ट्य –

सध्याच्या काळामध्ये शेतीसाठी विविध आधुनिक उपकरणांची आवश्यकता आहे, परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांना ही महाग शेती उपकरणे खरेदी करण्यास असमर्थ आहेत. या सर्व अडचणी लक्षात घेता, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन स्माम किसान योजना २०२१ सुरू केली गेली आहे. या योजनेद्वारे शेतकरी शेतीसाठी उपकरणे खरेदी करू शकतात. या योजनेअंतर्गत उपलब्ध उपकरणे देऊन शेतकर्‍यांना शेती करणे सोपे होईल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्नही वाढेल.

स्माम किसान योजनेचे लाभ कोणते?

 • या योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे.
 • या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ५० ते ८० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
 • या योजनेद्वारे शेतकरी सहजपणे शेतीची उपकरणे खरेदी करुन त्याचा उपयोग शेती आधुनिकीकरणासाठी करू शकतात.
 • अनुसूचित जाती जमातीच्या शेतकरी (एससी, एसटी, ओबीसी) प्रवर्गाला या योजनेचा अधिक लाभ मिळेल.
 • या योजनेचा लाभ देशातील शेतकर्‍यांना त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून सरकार प्रदान करेल.

स्माम किसान योजना २०२१ ची कागदपत्रे –

 • या योजनेंतर्गत भारत देशातील शेतकरी पात्र असतील
 • कोणत्याही आयडी पुरावाची प्रत (आधार कार्ड / ड्रायव्हर लायसन्स / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट)
 • पत्ता पुरावा
 • ओळखपत्र
 • बँक पासबुक
 • मोबाइल नंबर
 • जमिनीचा तपशील जोडताना रेकॉर्ड टू लँड (ROR )
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जदार कोणत्याही अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र

स्माम किसन योजना २०२१ मध्ये कसे अर्ज करावे?

smam kisan yojana registration online apply

देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन, अर्ज करूनलाभ घ्यावा.

 • प्रथम अर्जदारास योजनेच्या धिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल .
 • या मुख्य पृष्ठावर आपल्याला Registration पर्याय दिसेल. या पर्यायातून तुम्हाला Farmer या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हालायानंतर तुम्ही आधार क्रमांक भरताच एक फॉर्म तुमच्यासमोर उघडेल, आता तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती जसे की नाव, जिल्हा मोबाइल नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

या योजनेसंबंधित अधिक माहिती अर्ज प्रक्रिया, अर्जाचा मागोवा, सबसिडी कॅल्क्युलेटर, इत्यादी च्या माहिती साठी खालील SMAM PDF यावर क्लिक करून सविस्तर पाहू शकता. 

स्माम किसान योजना संपर्क (टोलफ्री नंबर) कुठे करायचा?

 • देशातील शेतकरी ज्यांना अर्ज करण्यास काही अडचण येत आहे. ते खाली दिलेला संपर्क फॉर्म वापरू शकतात.
 • सर्वप्रथम आपल्याला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल. या मुख्य पृष्ठावर तुम्हाला Contact असा पर्याय दिसेल.
 • त्यावर क्लिक केल्यावर स्क्रोल करून खाली आल्यावर State wise Nodal officer असे हेडींग दिसेल. त्यामध्ये राज्याचे नाव, अधिकाऱ्याचे नाव, मोबाइल नंबर, संपर्क पत्ता या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. त्यांना संपर्क करून तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.तसेच या योजनेसंबंधित आणखी माहितीदेखील मिळवू शकता.

स्माम किसान योजना हेल्पलाईन क्रमांक –

जर देशातील कोणत्याही शेतकऱ्याला या योजनेंतर्गत अर्ज करण्यात काही समस्या येत असेल किंवा त्याला या योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळवायची असेल, तर खाली दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्यांची समस्या सोडवता येईल.

 • महाराष्ट्र – 020-26122143
 • पंजाब – 9814066839, 01722970605
 • मध्य प्रदेश – 7552418987, 0755-2583313
 • झारखंड – 9503390555
 • हरियाणा – 9569012086
 • उत्तराखंड – 0135- 2771881
 • उत्तर प्रदेश – 9235629348, 0522-2204223
 • राजस्थान – 9694000786, 9694000786

इतर राज्यांसाठी कॉन्टॅक्ट वर क्लिक करा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »