खरीप हंगाम सन २०२१ युरिया खताचा संरक्षित साठा करण्याबाबतचा शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खरीप हंगाम सन २०२१ युरिया खताचा संरक्षित साठा करण्याबाबतचा २५ एप्रिल २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत. राज्यांमध्ये खरीप हंगामात जून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो या कालावधीमध्ये निर्णयात निरनिराळ्या कारणांमुळे म्हणजेच मुळातच आवंटन कमी होणे पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा येणे रेल्वे ट्रॅक वेळेवर उपलब्ध न होणे खत उत्पादन कारखाने कारण माहीत नसणे इत्यादीमुळे खताच्या मागणी प्रमाणे पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम होतो.

सध्याच्या स्थितीत कोरना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीत मजुरांच्या उपलब्धतेच्या अभावी खताच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी व उभ्या पिकांना खताचा दुसरा हप्ता देणे. यामुळे या खतांच्या मागणीमध्ये वाढ होत असते. खरीप हंगाम जून महिन्यापासून सुरू होत आहे. सदर महिन्यामध्ये युरिया खतांची मागणी वाढते शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताची उपलब्धता होण्यासाठी युरिया खताचा संरक्षित साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. 

एप्रिल व मे या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी नसते. त्यामुळे एप्रिल २०१९ पासून युरिया खतांचा साठा करण्यास सुरुवात केल्यास सध्या युरियाची मागणी नसल्याने साठा करण्यासाठी युरिया उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग जून महिन्यानंतर होणार आहे. सदर बाब विचारात घेऊन कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक २४ मार्च २०१९ रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यात दिड लाख मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्याबाबत निर्णय घेतले घेण्यात आलेला होता. तसेच संरक्षित साठा करण्यास महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास नोडल एजन्सी नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मान्यता प्रदान केली आहे.

शासन निर्णय-

खरीप हंगाम २०२१ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व वेळेवर युरिया खताचा पुरवठा करण्यासाठी १.५ लाख मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रयोजनार्थ महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ गोरेगाव, मुंबई या संस्थेचे शासनाने नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ गोरेगाव मुंबई यांनी दीड लाख मेट्रिक टन युरिया खताचा संरक्षित साठा करण्यासाठी खताची किंमत आगाऊ भरावी. या प्रयोजनासाठी महामंडळाने सादर केलेला खर्च हा अंदाज येत असल्याने यांनी प्रस्तावित केलेला खर्च किंवा प्रत्यक्षात केलेला खर्च यापैकी जे कमी असेल, ती रक्कम महामंडळास देण्यात येईल. तसेच संरक्षित केलेल्या युरिया खताची विक्री होईल, तसा खताचा साठा कमी होत जाणार आहे. असा हा १५ एप्रिल २०२१ चा महाराष्ट्र शासन निर्णय आहे. तो सविस्तरपणे पाहण्यासाठी खालील GR पहा बटणावर क्लिक करा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »