दहा कोटी मा.बाळासाहेब ठाकरे SMART प्रकल्पाकरिता निधी मंजूर

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठीचा १६ मार्च २०२१ चा राज्य शासन निर्णय पाहणार आहोत. सदर प्रकल्पासाठी ७ वर्ष्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. सन २०२१९-२० पासून ते २०२६-२७ पर्यंत या योजनेसाठी अंमलबजावणीस मान्यता दिली गेली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी “महाराष्ट्र राज्य कृषी यवसाय व ग्रामीण प्रकल्प संस्था” स्थापन करण्यात आली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत एकूण २१०० कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यापैकी ७०% निधी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदराच्या कर्ज स्वरूपात, तर २६% निधी हा राज्य शासनाच्या स्वनिधीतून गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ३.३३% निधी खाजगी क्षेत्राचा सहभाग म्ह्णून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन  माध्यमातून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत सन २०२२०-२१ मध्ये संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये राज्य हिश्याकरिता रुपये ३३० लाख आणि बाह्य हिश्याकरिता रुपये ७३६ लाख असे एकूण रुपये १०६६ लाख (रुपये दहा कोटी सहासष्ट लाख) एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प शासन निर्णय २०२१

या शासन निर्णयानुसार सन २०२०२-२१ साठी प्रकल्प संचालक, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांना प्रकल्पाअंतर्गत विविध कामाची अंमलबजावणी करण्यासाठी ३३-अर्थसहाय्य या उद्दिष्ट्यांतर्गत बाह्य हिश्याकरिता रुपये १० कोटी ३ लाख ५० हजार एवढा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

सदर निधीचे वितरण प्रकल्प संचालक , माननीय महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) संस्था, पुणे यांना वित्त विशेषतज्ञ आणि नियंत्रण अधिकारी यांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर शासन मंजूर निधीचे तात्काळ विनियोग करण्यात यावा आणि वेळोवेळी शासनास उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे असे या शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.
तसेच खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर परिपूर्ती मिळवावी जाणीव त्याचा अहवाल वेळोवेळी शासनास पाठवावा. असा हा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सविस्तरपणे पाहण्यासाठी खालील GR पहा बटनावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Leave a Comment

Translate »