नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा ५ फेब्रुवारी २०२१ रोजीचा नवीन शासन निर्णय पाहणार आहोत.राज्यात हि योजना ५ जानेवारी २०१७ योजी राज्यातील अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत करण्यासाठी सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पंप संच, जुनी विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन संच, नवीन विहीर, इनवेळ बोरिंग, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी इत्यादीबाबींसाठी राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.
सामाजिक न्यावं व विशेष साहाय्य विभागाने २०२०-२१ वर्ष्यात सदर योजनेसाठी दोनशे श्याह्यात्तर कोटी सहा लाख एकोणीस हजार एवढा निधी अर्थसंकल्पीय केला होता. कोविड-१९ पार्श्वभूमीवर मंजूर निधीपैकी ३३ टक्के निधी म्हणजेच ९१ कोटी एवढा निधी जिल्हा स्तरासाठी मंजूर करण्यात आला होता.

शासन निर्णय –
या योजनेअंतर्गत सन २०२०२-२१ मध्ये दोनशे श्याह्यात्तर कोटी सहा लाख एकोणीस हजार निधी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२१ शासन निर्णयानुसार प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
सदर मंजूर निधी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत वितरित करण्यात येणार आहे. आणि योजनेच्या अंमलबजावणीस संबंधित जिल्याचे अधिकारी यांच्याकडून वित्तीय मान्यता देण्यात येईल. असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे.
या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीचे वितरण खालील प्रमाणे काण्यात येईल.
सदर मंजूर निधीपैकी ५५ टक्के अनुदान हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन संचास देण्यात येईल. आणि उर्वरित ३५ टक्के अनुदान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंब योजनेसाठी (कमाल पन्नास हजार मर्यादेत) खालील प्रमाणे खर्च करण्यात येईल.
१. जर लाभार्थी शेतकऱ्याचा कृषी सिंचन संचास ७९,३६५/- यापेक्षा जास्त खर्च झाला असेल, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक योजनेतून ५५ टक्के तर डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेतुन २५,०००/- एवढे अनुदान देण्यात येईल.
२. डॉ आंबेडकर कृषी स्वावलंबन कृषी जलसिंचनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयाला प्रथम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक योजनेचा लाभ घेणे आवश्यक असणार आहे. या योजनेमधून फक्त टॉप अप साठीच अनुदान देण्यात येईल.
३. जर ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचा एकूण खर्च रु. १,५८,७३०/- (रुपये एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस ) किंवा त्या पेक्ष्या कमी झाला असेल, तर त्या लार्थी शेतकऱ्यास बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या दोन योजनांमार्फत ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची संपूर्ण माहिती अर्ज कसा करावा? कागदपत्रे कोणती ? पात्रता? अर्ज कोठे करावा?
४. जर लाभार्थी शेतकऱ्यलास तुषार सिंचन संच बसविण्यासाठी एकूण खर्च रु. ७९,३६५/- (रुपये एकोणऐंशी हजार तीनशे पासष्ठ ) किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -प्रति थेंब अधिक पीक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या दोन योजनांअंतर्गत ९०% अनुदान देण्यात येईल.



५. जर लाभार्थी शेतकऱ्याचा खर्च १,५८,७३०/- पेक्ष्या जास्त झाला असेल, तर त्या लाभार्थ्याला ५५% टक्के अनुदान हे कृषी सिंचन- प्रति थेंब अधिक पीक या योजनेतून देण्यात येईल. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५०,०००/- अवधी अनुदानित रक्कम देण्यात येईल.
सदर योजना चालू आर्थिक विषयाचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलद्वारे मागविले गेलेले असून लाभार्त्याची अनुदान अदा करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही हि ऑनलाईन पद्धतीनेच केली जाईल.
जर तुम्हाला हि माहिती महत्वपूर्ण वाटली असेल ,तर तुमच्या प्रतिक्रिया कंमेंटद्वारे नक्कीच आमच्यापर्यंत पोहचवा.