महाडीबीटी कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी खाते उघडणेबाबत निर्णय

mahadbt portal farmer schemes 2021

अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी 2021-

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची निगडित विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. योजनांची अंमलबजावणी पारदर्शक रीतीने करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यात सर्व योजनांचा अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्यात येतो. हा लाभ देण्याकरिता अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना ‘एक अर्ज योजना अनेक’ पद्धतीने सर्व बाबींसाठी एकाच अर्जाद्वारे शासनाकडे आपली उत्सुकता व्यक्त करण्यात येते.

अर्जातील नमूद विविध बाबी ज्या ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या सर्व योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या अर्जास संगणकीय सोडत पद्धतीने निवड प्रक्रियेत समाविष्ट करून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सद्यस्थितीत दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी च्या शासन निर्णयाद्वारे कृषी विभागाच्या प्रमुख योजनांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित योजनांचा लाभ देखील या प्रणालीवर टप्प्याटप्प्याने समावेश करण्यात येणार आहे. असे महाडीबीटी अंमलबजावणी शासन निर्यात नमूद केलेले आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांची लाभ वाटप कार्यपद्धती –

  • महाडीबीटी प्रणाली वरून निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि लाभाचे प्रधान करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे निधी वितरणाची कार्यपद्धती विशद केलेली आहे. सदर शासन निर्णयातील आजच्या तरतुदीनुसार अहरण व संवितरण अधिकाऱ्याला योजनानिहाय विशिष्ट बँक खात्यामध्ये निधी प्राप्त होणार आहे. तो निधी प्राप्त झाल्यावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निधी मध्यवर्ती पूल खात्यावर (सेंट्रल पूल अकाउंट) जमा करावयाचा आहे. जेणेकरून शेतकरी अर्जदार त्याप्रमाणे लाभ किंवा अनुदान हे थेटपणे त्याच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये प्राप्त होईल किंवा थेटपणे प्राधिकृत संस्था किंवा एजन्सी यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल.
  • कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच भविष्यात या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावयाची असेल. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वितरित करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूल खाते उघडण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याबाबत पुढील शासन निर्णय दिनांक २१ मे २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे.
maharashtra shasan portal

महाडीबीटी शासन निर्णय २१ मे २०२१ –

कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच भविष्यात या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावयाची असेल, त्या योजनाअंतर्गत निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूल खाते सेंट्रल फुल अकाउंट उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत असून, सदर खात्याचा वापर केवळ याच प्रयोजनासाठी करावा असे या शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे.

  • राष्ट्रीयीकृत तसेच खाजगी बँकांमध्ये खाती उघडण्याबाबत शासनाने सूचना निर्गमित केलेल्या असून, कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूर्ण खाते उघडताना सदर सूचनांचा अंमलबजावणी करावी.
  • महाडीबीटी प्रणालीसाठी कृषी आयुक्तालय स्तरावर उघडण्यात येणारे मध्यवर्ती फुल खाते पी एफ एम एस प्रणालीशी संलग्नित करावे.
  • महाडीबीटी प्रणालीद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी केंद्रीय पद्धतीने लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता प्रत्येक योजनेसाठी प्राप्त होणारा निधी हा प्रथमतः संबंधित योजनेच्या पी एफ एम एस प्रणालीशी संलग्नित बँक खात्यात जमा करावा. आणि नंतर तो निधी मध्यवर्ती पूर्ण खात्यावर म्हणजेच सेंट्रल पुल अकाउंट मध्ये जमा करावा. त्यानंतर कृषी आयुक्तालय स्तरावरून विविध योजना अंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने वितरित करण्यात यावा.

शासन निर्णय दिनांक १२ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ४ नोव्हेंबर २०२० मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार सहाय्यक संचालक लेखा-१, कृषी आयुक्तालय यांना मध्यवर्ती पूल खात्यावरून विविध योजनांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वितरण करावे.

असा हा महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागाच्या योजना साठीच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय २१ मे २०२१ रोजी घेण्यात आला. तो शासन निर्णय सविस्तर पणे पाहण्यासाठी खालील GR पहा या बटनावर क्लिक करा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »