नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा १४ जानेवारी २०२१ रोजी संमत झालेल्या नवीन महाराष्ट्र शासन जी. आर. विषयी माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक हि योजना सन २०१५-१६ पासून केंद्र शासन अमलात आणली. परंतु केंद्र शासनाच्या १८ मे २०१९ पत्रान्वये या योजनेचे सन २०२०-२१ या वर्षी महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी केंद्र शासनासाठी रु. ४०,००० लक्ष निधी मंजूर झाला. त्यानंतर दिनांक २१ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक साठी सन २०२०-२१ साठी रुपये ५१८.०५ कोटी वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिली गेली. त्यानंतर दिनांक ११ ऑगस्ट २०२० च्या शासन जी.आर. नुसार रुपये २०,००० लक्ष निधी वितरित करण्यात आला. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये १५६०० लक्ष तर अनुसुचित प्रवर्गासाठी रुपये २,००० लक्ष निधी मंजूर करण्यात आला होता. असा एकूण रुपये ३,३३३ लक्ष निधी बीडीएस प्रणालीद्वारे कृषी आयुक्त यांना वितरित करण्याचा प्रस्ताव केला होता. त्या अनुशंगाने शासनाने निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक घटकासाठी महाराष्ट्र शासन निर्णय २०२१ –
या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना घटकासाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी सन २०२०-२१ या वर्षातील अंमलबजावणीसाठी रुपये वीस कोटी म्हणजेच राज्य हिश्याच्या रुपये १३३३ लक्ष असा एकूण रुपये ३३३३ लक्ष निधी कृषी आयुक्त या बीडीएस प्रणालीवर वितरित करण्याच्या निर्णयाला शासनाने मान्यता दिली आहे.
२४ कोटी ४० लाख प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सन २०२०-२१ निधी वितरित
नोट –
सदर निधी हा फक्त आदिवासी लाभार्त्यांसाठीच खर्च करण्यात यावा अशी तरतुदी या शासन निर्णयात केली गेली गेलेली आहे.
- सदर निधी हा PFMS प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होईल याची कृषी आयुक्तांनी जबाबदारी घ्यावी असे या शासन निर्णयात नमूद केले गेलेले आहे.
- सदर मजूर निधी हा महाडीबीटी पोर्टल द्वारे वितरित करण्यात येणारआहे.
- तसेच सदर मंजूर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृ षी सिंचन योजना प्रती थेंब
- अधिक पीक घटकाच्या मार्गदर्शक सूचना २१ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना, अटी तसेच राज्य शासनने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे असे या निर्णयात नमूद केले गेले आहे.
महाराष्ट्र शासन gr प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रति थेंब अधिक पीक –
हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केला गेलेला आहे. नवीन कृषी जी.आर. च्या माहितीसाठी आमच्या संकेतस्थळला भेट द्या. आणखी काही माहिती हवी असेल तर ते तुमच्या कंमेंट द्वारे कळवा.