नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय २०२१ तसेच याच योजनेच्या संबंधित शासन निर्णयांची माहिती या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्ही पीक कर्ज काढले आहे, अथवा काढण्याचा विचार करत आहेत. तर तुम्हाला हे सर्व शासन निर्णय खूप माहितीदायक ठरणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण नक्कीच वाचा.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय १२ जून २०२१
पीक कर्जाची नियमित आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १२ जुने २०२१ च्या शासन निर्णयानुसार ३ लाखापर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज करण्यात येणार आहे. १ ते ३ लाखांचे कर्ज मर्यादेपर्यंत विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या १ टक्के व्याज दरात आणखी २ टक्के व्याजदर सवलत देण्याचा निर्णय हा १२ जून २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३ लाखापर्यंतचे पिक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने देण्याची घोषणा केलेले आहे.
डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याजदरात सवलत देण्यात येणार आहे. या योजनेत मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत व १ ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत १ टक्के व्याजदरात सवलत देण्यात येत होती. ती आता १ ते ३ लाख रुपये कर्ज मर्यादित शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय हा या मंत्रिमंडळ बैठकीत १२ जून २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार आता विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंतच या कर्जावर सरसकट ३ टक्के व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल. तसेच केंद्र शासनामार्फत ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड जर केली, तर २ टक्के व्याज सवलत ही मिळणार आहे. त्यामुळे आता सन २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड ही मुदतीत मध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत ही मिळणार आहे. म्हणजेच त्यांना सदरचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
यामुळे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी निविष्ठा जसे की खत, बियाणे, औषधे इत्यादी खरेदी करता येणार आहे. त्यातून शेती उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे कर्ज होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण देखील नक्कीच कमी होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख अंतर्गत राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती अंतर्गत जैविक शेती मिशन योजना

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय १९ ऑक्टोबर २०११ –
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना राज्यात यापूर्वीच अमलात आणलेली असून या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतसंस्थेने कडून रुपये तीन लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५०,०००/- र पर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याज सवलत व त्यापुढील रुपये ३ लाखांपर्यंतच्या कर्जावर २ टक्के व्याज सवलत देण्यात येते. तथापि रुपये तीन लाखापर्यंत अल्प मुदत कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने व्याज सवलतीचा दर वर्ष २०११-१२ पासून २ टक्के ऐवजी ३ टक्के करण्याचे योजले आहे. कर्जावरील व्याजाचा दर व व्याज सवलतीचा दर यात सुसंगतता असली पाहिजे. ही बाब विचारात घेऊन या योजनेअंतर्गत त्यात सवलतीत सुधारणा करणे व कर्ज मर्यादेची व्याप्ती वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यासंदर्भात शासनाने पुढील शासन निर्णय घेतलेला आहे.
शासन निर्णय –
- राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख योजना पीक उत्पादन प्रोत्साहन योजना राज्यामध्ये अमलात आणण्यात आलेली आहे सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या अनुषंगाने या योजनेची व्याप्ती अधिक वाढविण्यास या शासन निर्णयाद्वारे पुढील प्रमाणे मंजुरी देण्यात अली होती.
- या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा राष्ट्रीयीकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून रुपये एक लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के वार्षिक दराने व्याजाची सवलत लागू करण्यात आली.
- या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा राष्ट्रीयीकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून रुपये १ लाखापेक्षा जास्त पण रुपये ३ लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ टक्के वार्षिक दराने व्याजाची सवलत लागू करण्यात आली होती.
- वरील दोन मुद्दे त्यात नमूद केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड प्रत्येक वर्षी दिनांक ३० जून पर्यंत केल्यास ते या योजनेअंतर्गत सवलत घेण्यास पात्र राहतील.
- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या सुधारित योजनेचा लाभ सन २०११-१२ पासून अल्पमुदत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येईल.
अशाप्रकारे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे अधिक स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने रुपये ३ लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये १ लाखापर्यंत ३ टक्के व्याज सवलत व त्यापुढील कर्जाकरिता २ टक्के व्याजाची सवलत लागू करण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना शासन निर्णय २६ जुलै २०१६
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची अंमलबजावणी राज्य व जिल्हा स्तरावर यापैकी एकाच स्तरावर योजना राबवण्याचा शासन स्तरावर विचार सुरू होता. याबाबत आदेश देण्यात येतील तो पर्यंत जिल्हास्तरीय योजना राबवताना खालील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता. तो खालीलप्रमाणे आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना २०२१ माहिती
शासन निर्णय –
- या योजनेकरिता प्रथम जिल्हास्तरावरील योजनेतील उपलब्ध निधीचा वापर करावा. त्यानंतर अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास राज्य योजनेतून उपलब्ध होणारा निधी उपयोगात आणावा.
- या योजनेकरिता राज्य योजना व जिल्हा स्तरावरून निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत निधीचा दुहेरी लाभ लाभार्थ्यांना होणार नाही. याची जबाबदारी सर्व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची असून, त्यांनी याबाबत योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. अन्यथा त्यांना जबाबदार धरण्यात येईल. असे या शासन निर्णय मध्ये नमूद केलेले आहे.
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी ३०,०००/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी २०,०००/-कामगार योजना २०२३ महाराष्ट्र फायदे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
- ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
- समाज कल्याण हॉस्टेल योजना GR
- पीक नुकसान भरपाई योजना 2023 माहिती शासन निर्णय