शेतकऱ्यांसाठी बियाणांच्या उत्पादनाबाबत नवीन शासन निर्णय ३ जून २०२१

बियाणांच्या उत्पादनाबाबत नवीन शासन निर्णय ३ जून २०२१ –

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्याने विकसित झालेल्या अधिक उत्पादनक्षम वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी उत्पादन साखळीमध्ये पैदासकर पायाभूत प्रमाणित बियाणे देखील आवश्यक त्या प्रमाणामध्ये बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. पैदासकर बियाणांच्या कमी उपलब्धतेमुळे प्रमाणित बियाणांच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच प्रमाणित बियाणे यांच्या उपलब्धते अभावी शेतकऱ्यांना नाईलाजाने बाजारात उपलब्ध असलेल्या सत्यप्रत बियाणे किंवा सरळ वाणांच्या बियाणांवर अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होऊन पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये ही घट येते.

प्रमाणित बियाणांची पुरेशी पुरेशा प्रमाणात उपलब्धता होण्यासाठी पैदासकर बियाणांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करणे आवश्यक आहे. पैदासकर बियाणांचे उत्पादन करण्यासाठी जबाबदारी कृषी विद्यापीठावर असल्यामुळे या बियाणांच्या उत्पादनाबाबत व पारदर्शक कार्यपद्धती विकसित होण्याची आवश्यकता असल्यामुळे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने ३ जून २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने खालील पैदासकार बियाणे उत्पादनाबाबत शाखा कार्यपद्धती सूचना निर्णय शासन घेण्यात आलेला आहे.

पैदासकार बियाणे उत्पादनाबाबत शाखा कार्यपद्धती बाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

  • पैदासकर बियाणांचे उत्पादन करणे ही जबाबदारी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्था यांची असणार आहे. कृषी विद्यापीठांनी याबाबत त्यांचे नियोजन करणे हे आवश्यक आहे. पैदासकार बियाणे व्यतिरिक्त पायाभूत व प्रमाणित किंवा सत्यप्रत बियाणे उत्पादनामध्ये कृषी विद्यापीठाने भविष्यात अधिक लक्ष न देता पैदासकार बियाणांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे आहे.
  • ज्या विद्यापीठाने एखाद्या पिकाचे वाण विकसित केलेले आहे, त्या विद्यापीठाने संबंधित वाणाचे पैदासकार बियाणे संबंधित पीक पैदासकार यांच्या देखरेखीखाली शास्त्रीय दृष्टीने बीजोत्पादन करणे. विद्यापीठातील संशोधक वाहनांच्या पैदासकार बियाण्यांचा पुरवठा करणे विद्यापीठाला बंधनकारक राहणार आहे.
  • पैदासकार बियाणे उत्‍पादनासाठी संबंधित वाणाचे मूलभूत बियाणे संबंधित विद्यापीठाने तयार करणे हे अपेक्षित आहे. मूलभूत बियाणं बाबतचा सविस्तर अभिलेख किंवा नोंदणी ही कृषी विद्यापीठामार्फत ठेवण्यात यावी असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे. कृषी विद्यापीठामार्फत अभिलेख किंवा नोंदणी केली असल्याबाबतची पडताळणी ही संचालक संशोधन याने नियमितपणे करावी.
rashtriy ann surkhsha abhiyan, biyane vitran yojana,

कृषी विद्यापीठांना केंद्र शासनाकडून पैदासकार बियाणे उत्पादनाबाबत असे स्थानिक कळवले जातात. तसेच महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडूनही पैदासकार बियाणांची मागणी कृषी विद्यापीठाकडे केली जाते. कृषी विद्यापीठाने या सर्व मागण्या एकत्रित करून प्रत्येक पीक व वाणानुसार पैदासकार बियाणांची मागणी ही निश्चित करावी राष्ट्रीय बीज निगम शेतकरी उत्पादक कंपनी यांनी पुढील वर्षाच्या खरीप हंगामा साठी लागणाऱ्या पैदासकार बियाणांची मागणी चालू वर्षाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किमान दोन महिने अगोदर म्हणजेच १५ एप्रिल पर्यंत कृषी विद्यापीठाकडे नोंदवावी. तसेच त्याची एक प्रत ही कृषी आयुक्तालयाकडे द्यावी संबंधित कृषी विद्यापीठाने पैदासकार बियाणांची पीकनिहाय व निहाय मागणी एकत्र करून ती कृषी आयुक्तालयाला कळवावी. कृषी विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या मागणीचा विचार करून एकत्रितरित्या निहाय किती पैदासकार बियाणे उत्पादन करावयाचे आहे ते निश्चित करावे.

या शासन निर्णयाच्या अधिक सविस्तर माहितीसाठी GR पहा या बटनावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »