१० कोटी इ-गव्हर्नन्स कार्यक्रम योजना प्रशासकीय मान्यता सन २०२१-२२ महाराष्ट्र

नमस्कार मित्रांनो, आज आपण आर्थिक वर्ष २०२१-२२ राज्यामध्ये ई-गव्हर्नंस कार्यक्रम राबवण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा मंत्रिमंडळ बैठकीतील ८ जुलै २०२१ ची माहिती या लेखात पाहणार आहोत.

ई-गव्हर्नन्स म्हणजे काय?

कृषी व पणन विभागाचे मंत्रालय तसेच कृषि आयुक्तालय कार्यालयांचे संगणकीय दृष्ट्या बळकटीकरण व्हावे, यासाठी राज्यात ई-गव्हर्नंस कार्यक्रम योजना राबवली जाते. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय,कृषी आयुक्तालयामार्फत ई-गव्‍हर्नन्‍स कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम देखील राबविण्यात येत असतात. तसेच या योजनेअंतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येते. सदर योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे दरवर्षी काही ठराविक रक्कम मंजूर करून वाटप करण्यात येते. सदर मंजूर झालेली रक्कम ही कृषी विभाग तसेच कृषी आयुक्तालय, पुणे यांना विभागून वितरित करण्यात येते.

maharashtra shasan portal

ई-गव्हर्नंस कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकूण रुपये २५ कोटी अर्थसंकल्पीय केलेले असून वित्त विभागाने २०२१-२२ मध्ये राज्य गव्हर्नन्स कार्यक्रम राबवण्यासाठी आत्तापर्यंत रुपये १० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

सन २०२१-२२ मध्ये १० कोटी रकमेच्या मर्यादेत कार्यक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची तसेच निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासनाने ८ जुलै २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णय (इ-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म लेटेस्ट अपडेट) २०२१-२२

कृषी व पदुम विभाग मंत्रालय इ कार्यालयाने व कृषी आयुक्तालय पुणे व विविध कार्यालयांचे संगणक दृष्ट्या बळकटीकरण करण्यासाठी राज्य गव्हर्नन्स कार्यक्रम ही राज्य योजना राबवण्यात येत असते. या योजनेसाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी रुपये १० कोटी रकमेच्या मर्यादित गव्हर्नन्स कार्यक्रम राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

सन २०२१-२२ मध्ये गव्हर्नन्स कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरता पहिल्या टप्प्यात १० कोटी निधी कृषी विभागाकडून कृषी विभाग व पदुम विभाग मंत्रालय व कृषी आयुक्तालय, पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे.
सदर वितरीत निधी हा विविध बाबींसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने मान्यता देखील दिली आहे. या सदर मंजूर वितरित निधी विविधबाबींसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्या खर्च बाबी सविस्तरपणे पाहण्यासाठी आणि प्रत्येक बाबीसाठी वितरित रक्कम पाहण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि खर्च बाबी आणि वितरीत निधी यांची माहिती पहा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »