१० कोटी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम शिष्यवृत्ती योजनेसाठी निधी वितरित २०२१

नमस्कार मित्रांनो, आज आपण पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या शिष्यवृत्ती योजनेच्या महाराष्ट्र राज्य शासन निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. आदिवासी घटक कार्यक्रमांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांचे सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षांमधील प्रलंबित अनुदान अदा करण्यासाठी चा आहे. सन २०२१-२२ मधील उपलब्ध आर्थिक निधी वितरीत करण्याबाबत आलेल्या प्रस्तावास अनुसरून वित्त विभागाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. सदर मर्यादीत निधी वितरणाबाबत शासन विचाराधीन होते, त्या अनुषंगाने खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत.

स्वयंम शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय १६ जुलै २०२१

  • आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांचे कल्याण यासाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित अनुदान अदा करण्यासाठी २०२१-२२ अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार १० कोटी ५० लाख इतका निधी वितरित करून खर्च करण्यास १६ जुलै २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे.
  • रुपये १०५०.०० लाख (अक्षरी रुपये दहा कोटी पन्नास लाख फक्त) इतका निधी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त, आदिवासी विकास यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे.
  • सदर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार खर्च झालेल्या रकमेचा अहवाल, शिष्यवृत्ती अदा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा तपशील, निधी उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादी संबंधित माहिती आदिवासी विकास विभाग विभागाकडे पाठवावी. उपयोगिता प्रमाणपत्र सह पुढील निधी साठी प्रस्ताव सादर करण्यात यावा असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे. 
हा शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी आणि त्याची सत्यप्रतता जाणून घेण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Leave a Comment

Translate »