१० कोटी फळपीक विमा योजना सन २०२०-२१ साठीआंबिया बहराकरिता निधी वितरीत

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ साठी आंबिया बहर यासाठीच दिनांक २२ मार्च २०२१ रोजीचा राज्य शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे हा निर्णय आणि किती मंजूर झाला आहे निधी या शासन निर्णयात. जर तुम्हीही फळबाग लावलेली असेल आणि बदलत्या हवामनामुळे तुमच्याही फळपिकांचे नुकसान झाले असेल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

शेतकऱ्यांना फळपिकांना पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामान धोक्यांपासून फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर फळबाग पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान झाल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही अश्या परिस्थिती शेतकऱयांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळ पीक नुकसान भरपाई त्यासाठी एक उपाय म्हणून फळपीक विमा योजना सुरु करण्यात आली होती. त्यामध्ये आंबिया बहराकरिता खालील ८ पिकांना फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा दिला जाईल .
१. संत्रा
२. मोसंबी
३. काजू
४. डाळिंब
५. आंबा
६. केळी
७. द्राक्ष
८. स्ट्रॉबेरी

या आंबिया बहार या आठ पिकांसाठी जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजना सन २०२०-२१ मध्ये राबवण्यासाठी शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

फळपीक विमा योजना सन २०२०-२१ साठी आंबिया बहर २४ मार्च २०२१ शासन निर्णय

फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२०-२१ अंतर्गत कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणीचा विचार करता भारतीय कृषी विमा कंपनीस रक्कम रु.१०,६५,३०,६५२-/ (१० कोटी ६५ लाख ३० हजार ६५२) इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरित करण्याची शासनाने दिनांक २२ मार्च २०२१ रोजी मान्यता देण्यात आली आहे. तो शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील GR पहा या बटनावर क्लिक करा.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०१८-१९ मध्ये आंबिया बहराकरिता रक्कम विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन २०१८-१९ मध्ये राबविण्यासाठी शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेत सन २०१८-१९ साठी सहभागी कंपन्यांनी मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदानाची मागणी कृषी आयुक्तालयाने सादर केली आहे. त्याला अनुसरून खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

                         फळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी

फळपीक विमा योजना २०१८-१९ शासन निर्णय २२ मार्च २०२१

कृषी आयुक्तालयाने केलेल्या मागणीचा विचार करून कृषी विमा कंपनीस रु. १३,९५,७५६-/ (रुपये १३ लाख ९५ हजार ७५६ ) इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील GR पहा बटनावर क्लिक करा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »