१९ कोटी कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१ राबविण्यासाठी निधी मंजुरी शासन निर्णय

नमस्कार शेतकरी, मित्रांनो आज आपण राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना २०२०-२१ योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या शासन निर्णयाची माहिती पहाणार आहोत.

१२ सप्टेंबर, २०१८ रोजी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. सदर योजना हि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येते. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना उप अभियानाअंतर्गत वैयक्तीक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, तसेच इतर कृषी अवजारे आणि यंत्रे खरेदीसाठी अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र राज्य सरकारने ७६ कोटी एवढा निधी २०२०-२१ साठी मंजूर करण्याची तरतूद केली आहे. सदर योजनेअंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी तसेच शेतकऱ्यांना वैयक्तीक यंत्रे आणि कृषी अवजारे देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी योजनेच्या तरतुदीनुसार ७५ टक्के म्हणजेच रुपये ५७ कोटी एवढा निधी वितरित करण्यास अनुमती मागण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे केला गेला होता. त्यानुसार वित्त विभागाने २५ टक्के निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

वित्त विभागाने या प्रत्स्तवाचा विचार करून २५ टक्के म्हणजेच एकूण मंजूर निधीच्या म्हणजेच ७६ कोटी च्या २५ टक्के म्हणजेच १९ कोटी एवढा निधी मंजुरीस ५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयात मान्यता दिली आहे.

tractor yojana
शासन निर्णय –

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना २०२०-२१ वर्ष्यासाठी योज़नेच्या अंमलबजावणीस १९ कोटी निधीस प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली.

सादर मंजूर निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल, असे या शासन निर्णय मध्ये नमूद केले गेलेले आहे.

सदर अनुदानित रक्कम हि महाडीबीटी पोर्टलद्वारे वितरित केली जाईल. मंजूर अनुदानित रक्कम हि लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात PFMS प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अल्प तसेच अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती जमाती आणि महिला यांच्यासाठी ट्रॅक्टर घटकासाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात यावे.

या निधीचे वितरणास नियंत्रण अधिकारी कृषी आयुक्त,कृषी आयुक्तालय पुणे,आणि संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असणार आहेत.
सादर शासन निर्णय जी. पाहण्यासाठी क्लिक करा आणि सविस्तर शासन निर्णय पहा.

जर तुम्हाला हि माहिती महत्वपूर्ण वाटली असेल ,तर तुमच्या प्रतिक्रिया कंमेंटद्वारे नक्कीच आमच्यापर्यंत पोहचवा.

Leave a Comment

Translate »