१ कोटी अनुदान मंजुरी देशी गाय प्रक्षिक्षण आणि संशोधन केंद्रासाठी शासन निर्णय २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारचा २२ फेब्रुवारी २०२१ रोजीचा मंत्रिमंडळ शासन निर्णय पाहणार आहोत. मग मित्रांनो जर तुम्ही दूध उत्पादक शेतकरी असाल, तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पुणे अंतर्गत दुग्धशास्त्र व पशुसंवर्धन विभागाअंतर्गत देशी गाईंची कार्यक्षमता आणि संवर्धन करून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित दूध तसेच दूध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने “देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र” स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण चार वर्ष्याच्या कालावधीसाठी पावसाळी अधिवेशन २०२० मध्ये मंजूर शासन निर्णयाप्रमाणे २ कोटी एवढ्या निधीला मान्यता दिली गेली होती. त्या शासन निर्णय अनुसरून चालू आर्थिक वर्ष्यासाठी क्काही रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुसरून खालील शासन निर्णय घेण्यात आला आहे.

native cow image, deshi gai photo,

शासन निर्णय २२ फेब्रुवारी २०२१

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पुणे अंतर्गत देशी गाय प्रक्षिक्षण आणि संशोदन केंद्रासाठी अनुदान म्हणून १ कोटी निधी वितरित करून “देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र” स्थापन करण्याचा शासन निर्णय २२ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आला आहे.
सदर अनुदानित निधी वितरणासाठी काही अटी लागू असणार आहेत, त्या अटी खालीलप्रमाणे असतील.

१. सदर मंजूर निधी हा मंजूर घटकासाठीच वापरण्यात यावा, जर मंजूर अनुदानित निधी पासून शिल्लक निधी हा इतर घटकासाठी खर्च करण्याचे अधिकार हे कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना असतील.

२. “देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र” चे संशोधन आणि विस्तार करण्यासाठी नव्याने पदनिर्मिती करण्यात येईल.

सविस्तर अटी आणि शर्ती जाणून घेरण्यासाठी आणि सदर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

 उपविभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर तथा आहरण आणि संवितरण अधिकरी यांना मंजूर केलेले अनुदान कृषी विद्यापीठाचे नियंत्रक यांना सुपूर्त करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

buffalo imge

अश्याच महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयाची माहिती पाहण्यासाठी वारंवार आमच्या साईटला भेट द्या. आणखी कोणत्या शासन निर्णयांची माहिती हवी असल्यास, तुम्ही कंमेंट मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment

Translate »