२०२ कोटी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित निर्णय जून २०२१

नमस्कार मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) सन २०२१-२२ साठीचा शासन निर्णय दिनांक २८ जून २०२१ ची माहिती पाहणार आहोत. हा शासन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत २८ जून २०२१ रोजी घेतलेला आहे. जर तुम्ही पोखरा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा अर्ज केला असेल. तर तुमच्यासाठी हा GR महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) २०२१-२२ 

हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या मराठवाड्यातील आणि विदर्भातील ४,२१० गावे तसेच पूर्णा नदीच्या खोर्‍यातील ९३२ गावे अशी एकूण ५,१४२ गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे चार हजार कोटी खर्चाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वरील सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता बाह्य हिस्याची रुपये १७५ कोटी आणि राज्य हिस्याची ७५ कोटी असा एकूण मिळून रुपये २५० कोटी हा निधी वितरित करण्यात आलेला होता. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प संचालक यांच्याकडून या उद्दिष्टा खाली शिल्लक असलेला रुपये २०२.४३ कोटी यामध्ये बाह्य हिस्सा रुपये १७५कोटी आणि राज्य हिस्सा २७.४३ कोटी निधी वितरित करण्याचा प्रस्ताव झाला आहे. त्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) अंमलबजावणीसाठी राज्य आणि बाह्य हिस्सा असा एकूण २०२.४३ कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रक्लपानांतर्गत (पोखरा) समाविष्ट जिल्यांची आणि गावांची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
nanaji deshmukh krushi sanjivani yojana image

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा शासन निर्णय २८ जून २०२१

सन २०२१-२२ करिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी २०२.४३ कोटी (अक्षरी रुपये २०२ कोटी ४३ लाख) अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यासाठी मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाह्य हिस्सा १७५ कोटी आणि राज्य हिस्सा २७ कोटी ४३ लाख असा एकूण मिळून २०२.४३ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय सविस्तरपणे पाहण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Leave a Comment

Translate »