२४ कोटी ४० लाख प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सन २०२०-२१ निधी वितरित

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज आपण दिनांक २२ मार्च २०२१ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०२०-२१ शासन निर्णय पाहणार आहोत. सन २०१५-१६ पासून, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अमंलबजावणी राज्यात करण्यात येत आहे . यामध्ये केंद्र राज्य हिश्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.

sprinkler, tushar sinchan

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक घटकाची सन २०२०-२१ या वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र हिश्याच्या रु.४०,०००-/ लक्ष नियतव्यय कळविला आहे . निर्णयानव्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या सन २०२०-२१ च्या ५१८.०५ कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशायकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा नवीन महाराष्ट्र शासन जी.आर.३३३३ लक्ष निधी मान्यता

केंद्र शासनाने पहिल्या हप्त्याचा रु. २०,००० लक्ष निधी वितरित केला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.१५,६०० लक्षअनुसुचित जातीसाठी रु.२,४०० लक्ष व अनुसुचित जमातीसाठी रु.२,००० लक्ष निधीचा समावेश आहे . केंद्र शासनाने वितरित केलेल्या निधीपैकी अनुसुचित जाती प्रवर्गाचा रु.१४४० लक्ष व त्यास समरूप राज्य हिश्याचा रु. १००० लक्ष असा एकूण रु.२,४४० लक्ष निधी आयुक्त (कृषी) यांना बिडीएस प्रणालीवर वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारीन होता. त्यानुसार शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शासन निर्णय २२ मार्च २०२१ 

 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -प्रति थेंब अधिक पीक योजनेसाठी अनुसुचित जाती प्रवर्गासाठी सन २०२०-२१ या वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र हिश्याचा रु. १४ कोटी ४० लक्ष रुपये व त्यास समरूप राज्य हिश्याचा रुपये दहा कोटी असा एकूण रुपये चोवीस कोटी चाळीस लक्ष निधी कृषि आयुक्त यांना बीडीएस प्रणालीवर वितरित करण्यास २२ मार्च २०२१ रोजी शासन मान्यता देण्यातआली आहे. तो शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील GR पहा या बटनावर क्लिक करा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »