२५० कोटी (पोखरा) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) ६ मे २०२१ चा राज्य शासन निर्णय ची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात, काय आहे हा शासन निर्णय.
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोर्‍यातील खारपाणपट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५,१४२ गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे रुपये ४,००० कोटी अंदाजित खर्चाचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून भविष्यातील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यांवर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहेत. परिणामी शेती मधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच त्यांना नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्ग हाच शार्प असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

nanaji deshmukh krushi sanjivani yojana image

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावात मध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यात शासन निर्णयानुसार मान्यता दिली गेली आहे. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्याकडून निधी वितरणाबाबत असा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रुपये २५० कोटी एवढा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प शासन निर्णय ६ मे २०२१ –

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणीसाठी २५० कोटी निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास ६ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली असून, सदर वितरित करण्यात येत असलेल्या निधीपैकी व राज्य शासनाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे.

  • सदर शासन निर्णयानुसार बाह्य हिश्याचा निधी १७५ कोटी असणार आहे.
  • राज्य हिश्याचा मंजूर निधी हा ७५ कोटी एवढा आहे.
  • असा एकूण मिळून वितरीत निधी हा २५० कोटी असणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply