२ कोटी बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामाच्या उभारणी साठी निधी मंजुरी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केंद्र शासनच्या बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामाच्या उभारणी योजनेसाठीचा १९ मार्च २०२१ चा शासन निर्णय पाहणार आहोत.

कृषी क्षेत्रामध्ये विविध पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर उच्च प्रतीचे गुणवत्तापूर्ण व जास्त उत्पादन देणाऱ्या जातींचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रशासनने गावपातळीवर शेतकऱ्यांना विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्यासाठी आवश्यक उपलब्धता करून देण्याची आवश्यकता आहे. या शासन निर्णय शासन स्तरावरील बियाणे क्षेत्रातील सुधारणा विषयीची सचिव कार्य गटाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ रोजी च्या पत्रान्वये बियाणे व लागवड साहित्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी / सहाय्यता गट /अन्नधान्य उत्पादक संघ/ सहकारी संस्था उभारणी करण्याबाबत कळविण्यात आले होते.

rashtriy ann surkhsha abhiyan, biyane vitran yojana,

सदर योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर बियाणी प्रक्रिया आणि साठवणूक केंद्र उभारणीसाठी रुपये ६० लाख किंवा प्रत्यक्ष उभारणीचा येणारा खर्च यापैकी जे कमी असेल तितके अर्थसहाय्य देय आहे. कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या पत्रान्वये राज्यातील २० बीज प्रक्रिया केंद्र आणि बियाणे साठवणूक गोदाम उभारणीसाठी सन २०१७-१८ करिता उपलब्ध करून दिलेली रक्कम १२ कोटी एवढी सन २०१८-१९ मध्ये वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बियाणे व लागवड साहित्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी / स्वयंसहायता गट / अन्नधान्य उत्पादक संघ / सहकारी संस्था राज्य शासनाची मान्यता असलेली आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांमार्फत पाचशे मेट्रिक टन क्षमतेचे बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणूक गोदामांची उभारणी करणे हा कार्यक्रम सन २०१८-१९ मध्ये राबवण्यास दिनांक ३ऑगस्ट २०१८ रोजी च्या शासन निर्णयाद्वारे प्रशासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी च्या शासन निर्णयानुसार बीजप्रक्रिया केंद्र आणि बियाणे साठवणूक गोदामे उभारण्यात बाबतचे प्रस्ताव शासनास सादर करण्या करता कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र, पुणे येथे कृषी संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीने एकूण २९ प्रस्तावांची शिफारस शासनास दिलेली होती . सदर २९ प्रस्तावांपैकी २० प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेली असून, त्याकरिता १२ कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सन २०१८-१८ मधील १२ कोटी इतका निधी सन २०१९-२० मध्ये पुनर्जीवित करून दिलेला आहे. या १२ कोटी निधीपैकी सन २०१९-२० मध्ये ७ कोटी ६६ लाख ७२ हजार इतका निधी खर्च केलेला आहे. उर्वरित ४ कोटी ३३ लाख २६ हजार इतका अखर्चित निधी राज्य शासनास सुपूर्त करण्यात आला होता. सदर अखर्चित निधी पैकी केंद्रशासनाने सन २०२०-२१ मध्ये राज्य शासनास पुनरुज्जीवित करून दिलेला आहे सदर पुनर्जीवित झालेला
रुपये ४ कोटी ३३ लाख २८ हजार निधीपैकी कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे रुपये २ कोटी २७ लाख ३९ हजार इतका निधी त्यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती.

pack house

 

शासन निर्णय १९ मार्च २०२१ –

सदर अभियानांतर्गत ग्रामपंचायत पातळीवर शेतकरी उत्पादक कंपनी /स्वयंसहायता गट /अन्नधान्य उत्पादक संघ /सहकारी संस्था कृषी क्षेत्राशी संबंधित व राज्य शासनाची मान्यता असलेली कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांमार्फत पाचशे मेट्रिक टन क्षमतेचे सन २०१८-१९ मध्ये शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेल्या २० बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवून गोदामांची उभारणी करण्यासाठी शंभर टक्के केंद्र पुरस्कृत पूर्णजीवित करून दिलेल्या ४ कोटी ३३ लाख २८ हजार निधीपैकी २ कोटी २७ लाख ३९ हजार इतका निधी हा कृषी आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यात येत आहे. या शासन निर्णयाला १९ मार्च २०२१ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. तो शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील GR पहा बटनावर क्लिक करा.

  • सदर अभियान राबवताना केंद्र शासनाच्या सूचनांनुसार व केंद्र शासनाचा निधी वितरित व शर्तीचे तसेच राज्य शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
  • सदर योजनेकरता कृषी आयुक्तालय स्तरावरील (कृषी आयुक्त) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना योजनेचे नियंत्रण अधिकारी म्हणून व सहायता संचालक लेखा -१ यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून व जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना योजनेचे नियंत्रण अधिकारी  म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment

Translate »