५९६ कोटी कृषी पंप आणि यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत निधी मंजुरी

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप ग्राहकांना आणि यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य सन २०२१-२२ शासन निर्णय दिनांक २९ जून २०२१ महाराष्ट्र शासन परिपत्रक (GR) २०२१ ची माहिती पाहणार आहोत.

कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत –

राज्यातील विविध विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित वीज दरात सवलत देण्यात येते. तसेच त्याची परिपूर्ती शासनाकडून महावितरण विद्युत कंपनीस केली जात असते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कृषिपंप ग्राहकांना अर्थसहाय्य याकरिता आर्थिक वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये रुपये ५,३०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे.
महावितरण कंपनीकडून विद्युत शुल्कापोटी व वीज विक्री कर यासाठी जमा करण्यात आलेला एकूण रकमेपैकी मार्च २०२१ पर्यंत ३२०७.३१ कोटी इतक्या रकमेचे समायोजन करणे बाकी आहे. त्याअनुषंगाने रोजी खालील शासन निर्णय घेण्यात आला

कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत शासन निर्णय २८ जून २०२१

कृषी पंप ग्राहकांना सन २०२०-२१ या वर्षात मिळालेल्या सवलतीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना देय असलेल्या अनुदानाचा रकमेपैकी ३६१ कोटी रोख रक्कम वितरित न करता समायोजनाने वितरित करण्यास दिनांक २९ जून २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली गेली आहे.
या शासन निर्णयाद्वारे समायोजनाने वितरित करावयाची रक्कम म्हणजेच ३६१ कोटी रुपये हे महावितरण कंपनीस रोख न देता पुढील टप्प्यात दर्शविल्याप्रमाणे महावितरण कंपनी यांच्याकडून शासनास येणे असलेल्या रकमेपोटी वसूल करण्यात यावी. तसेच खाली नमूद केलेल्या लेखाशिर्ष खाली समायोजनाद्वारे जमा करण्यात यावी.

कृषी पंप आणि यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत gr

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना उपरोक्त समायोजनाद्वारे वितरित करावयाची रक्कम ही वित्त विभागाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या मर्यादित असणार आहे. असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे. हा शासन निर्णय सविस्तर पणे पाहण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

यंत्रमाग ग्राहकांना वीजदरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला द्यावयाचे अर्थसहाय्य सन २०२१-२२

महाराष्ट्र राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून दरात सवलत देण्यात येते. तसेच त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून महावितरण कंपनीस केली जात असते. त्यासाठी रुपये ६०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पातकेली गेलेली आहे त्या तरतुदी मधून वित्त विभागाने मान्यता दिल्यानुसार महावितरण कंपनीस रोखीने रुपये २३५ कोटी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील निर्णय घेतलेला आहे

यंत्रमाग ग्राहकांना वीजदरात सवलत निधी शासन निर्णय २९ जून २०२१

यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना देय असलेली अर्थसहाय्याची रक्कम २३५ कोटी रुपये हे रोखीने वितरित करण्यास शासनाने २९ जून २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.

सदर रुपये २३५ कोटी निधी ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच कारणासाठी महावितरण कंपनीने खर्च करण्याची दक्षता घ्यावी. असे या शासन निर्णयामध्ये नमूद केले गेले आहे. हा शासन निर्णय सविस्तर पणे पाहण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »