५ कोटी जैविक सेंद्रिय विषमुक्त शेती मिशन २०२१ निधी मंजूर २० ऑगस्ट २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सेंद्रिय विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिल्याची मान्यता दिल्याचा २० ऑगस्ट २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला शासन निर्णय आज या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात काय आहे हा शासन निर्णय, किती निधी या शासन निर्णयात विषमुक्त शेतीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन २०२१ (Organic detoxification farming mission) –

  • सध्याच्या काळात अन्नधान्याच्या संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिकाधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच तननाशकांचा मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतीद्वारे उपयोग केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी मृतवत होत चाललेल्या आहेत. याचा परिणाम पशुपक्षी, मानव यांच्या आरोग्यावर देखील होत आहे.
  • या रासायनिक खतांचा वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चाललेली आहे. त्यामुळे जमीन मशागतीसाठी लागणारा खर्च यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.
  • तसेच रासायनिक कीटकनाशके खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तर सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये उत्पादन घेतलेल्या शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण, बाजारपेठ शृंखला, समूह गट स्थापना, प्राथमिक प्रक्रिया या माध्यमातून शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून योग्य असा शेतमालाला भाव मिळू शकेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन निव्वळ नफ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. यासाठी राज्य पुरस्कृत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सेंद्रिय /विषमुक्त शेती ही राज्यात राबवण्यात येत आहे.
maharashtra shasan portal

जैविक शेती मिशन २०२१-२२ –

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षी या योजनेचा अंमलबजावणीकरिता रुपये १० कोटी एवढा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. तरी या सदर अर्थसंकल्पीय मंजूर निधीच्या ५० टक्के निधी म्हणजे रुपये पाच कोटी हा अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने २० ऑगस्ट २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत खालील शासन निर्णय घेतला आहे.

पाच कोटी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती २०२०-२१ मध्ये खर्च करण्यास मान्यता

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२१

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन ही राज्य पुरस्कृत सेंद्रिय विषमुक्त शेती राबवण्यातकरता अर्थसंकल्पीय केलेल्या रकमेपैकी ५० टक्के निधी म्हणजेच रुपये ५ कोटी निधी हा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची मान्यता दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे.

  • वितरण करण्यात येणाऱ्या निधीचे हरण आणि संवितरण म्हणून आयुक्तालय स्तरावर नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त कृषी, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक लेखा-१, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना घोषित करण्यात आलेले आहे.
  • जिल्हास्तरावर नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, अकोला आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, अकोला कार्यालयातील लेखाधिकारी यांना नियुक्त करण्यात आलेले आहे.

या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणून घेण्यासाठी आणि अधिक सविस्तर माहितीसाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Leave a Comment

Translate »