७०.६७ लाख नारळ विकास बोर्ड योजना प्रशासकीय मान्यता ९ सप्टेंबर २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नारळ विकास विभाग योजनेच्या अंमलबजावणीसाठी घेण्यात आलेल्या ९ सप्टेबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची माहिती आज या लेखात पहाणार आहोत.

महाराष्ट्र नारळ विकास मंडळ

महाराष्ट्रात नारळ विकास मंडळ पुरस्कृत नारळ विकास योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये विविध योजना किंवा भौतिक बाबींचा सविस्तर तपशील नारळ विकास बोर्डाच्या दिनांक २९ जून २०२१ मध्ये दिलेला आहे. नारळ विकास मंडळ यांनी त्यांच्या दिनांक २९ जून २०२१ च्या पत्रामध्ये नारळ विकास योजना राज्यात राबविण्यासाठी ७०.६७ लाख इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये नारळ विकास मंडळाचा हिस्सा ६३.९५ लाख इतका आहे. 

महाराष्ट्र शासन परिपत्रक 2021 कृषी विभाग GR 

आर्थिक लक्षांकाचे वाटप आदिवासी उपयोजना, सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जाती उपयोजना प्रवर्ग निहाय निश्चित केलेले आहे. नारळ विकास योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाची शासकीय मान्यता मिळाल्यानंतर नारळ विकास मंडळाचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी च्या बैठकीत खालील शासन निर्णयास मंजुरी दिलेली आहे.

maharashtra shasan portal

महाराष्ट्र नारळ विकास बोर्ड योजना महाराष्ट्र (GR) शासन निर्णय ९ सप्टेंबर २०२१

नारळ विकास बोर्ड योजनेस केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने दिलेली मान्यता विचारात घेऊन, सन २०२१-२२ मध्ये नारळ विकास मंडळ, कोची यांच्या पुरस्कृत नारळ विकास योजना राबवण्यास ७०.६७ लाख इतक्या रकमेच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. या मंजूर रकमेत केंद्र हिस्सा रुपये६३.९५ लाख तर राज्य हिस्सा रुपये ५.२५ लाख आणि लाभधारक शेतकरी हिस्सा रुपये १.४७ लाख असा एकूण मिळून ७०.६७ लाख इतका आहे.

या योजनेच्या राज्य हिस्सा, अनुसूचित जाती जमाती हिस्सा, सर्वसाधारण हिस्सा तसेच लागवड साहित्य व उत्पादन विवरण इत्यादी घटकांच्या अधिक सविस्तर माहितीसाठी आणि या योजनेच्या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणण्यासाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा.

Leave a Comment

Translate »