१२२ कोटी २६ लक्ष अतिवृष्टी पीक विमा अनुदान मंजूर यादी महाराष्ट्र २०२१ शासन निर्णय GR

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मार्च, एप्रिल, मे २०२१ या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये कोणत्या जिल्यांना या शासन निर्णयामध्ये किती अनुदान मंजूर आहे याची माहिती या लेखात आपल्याला मिळणार आहे. जर तुम्हीही एक शेतकरी असाल, तर पहा तुमच्या जिल्ह्यासाठी किती अनुदान मंजूर झाले आहे.

अतिवृष्टी पीक विमा अनुदान महाराष्ट्र २०२१

मार्च, एप्रिल आणि मे २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये गारपीट आणि अवेळी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणी प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात यावे. तसेच त्यानुसार मदत निधी देण्यात यावे असा शासन निर्णय दिनांक १२ मे २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलेला होता. त्यास अनुसरून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार क्षेत्रासाठी मदत देण्याकरिता रुपये १२२२६.३० लक्ष एवढ्या निधीचे मागणी प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने रुपये १२२२६.३० लक्ष निधीचा प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्यात आलेला होता. त्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिलेली आहे.

यानुसार विभागीय आयुक्त कोकण, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक यांना रुपये १२२ कोटी २६ लक्ष ३० हजार एवढा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये खालील शासन निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टी पीक विमा मंजूर शासन निर्णय दिनांक ६ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे किंवा फळपिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे किंवा फळपिकांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी किंवा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुदान अनुज्ञेय करून एकूण मदत देण्यास प्राप्त झालेल्या शासन मान्यतेनुसार महाराष्ट्र राज्य शासनाची मान्यता प्रदान करण्यात अली आहे.

(Pik Vima Yadi Maharashtra 2021) अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ मंजूर जिल्हे 

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ मंजूर जिल्हे
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ मंजूर जिल्हे (2)

या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणण्यासाठी खालील GR पहा या बटनावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे हा महाराष्ट्र राज्य शासन निर्णय जीआर पहा.

Leave a Comment

Translate »