२२० कोटी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना २०२१ साठी निधी मंजूरी

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २०२१ महाराष्ट्र: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला होता. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजना केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून राज्यात राबवण्यात येत असून, सदर योजने मध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के आर्थिक सहभाग आहे.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सदर योजनेची रुपये १०० कोटी व पुरवणी द्वारे ११५.१४ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीकरिता विमा हप्ता व प्रशासकीय खर्चासाठी राज्य हिश्श्या पोटी रक्कम रुपये ५६ कोटी ३१ लक्ष एवढा निधी वर्ग करून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील शासन निर्णय घेतले आहेत.

हे वाचामहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2021 महाराष्ट्र संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना (PMJAY) कार्ड Online Apply २०२१

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासन निर्णय २२ ऑक्टोबर २०२१

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी आरोग्य हमी सोसायटी मार्फत होत असल्याने, योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांचा विमा हप्ता देण्या साठी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीतून रुपये २२० कोटी २५ लक्ष एवढा निधी राज्य आरोग्य हमी सोसायटी च्या खात्यावर तात्काळ जमा करण्यासाठी या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर निधी नियंत्रक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला आहे. या रकमेचा धनादेश राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी आणि त्याची सत्यप्रतता जाणण्यासाठी खालील या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तर पणे पहा.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्र २०२१ शासन निर्णय जीआर

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी विमा हप्ता आणि प्रशासकीय खर्चासाठी राज्य शासनाच्या निधीपैकी म्हणजेच ४० टक्के निधीपैकी ५६ कोटी ३१ लक्ष एवढा निधी वितरित करण्यास दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणण्यासाठी खालील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्र २०२१ GR या बटनावर क्लिक करा

Leave a Comment

Translate »