New Updates दुबार पीक कर्जाच्या परतफेडीची मुदतवाढ शासन निर्णय ५ ऑगस्ट२०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पीक कर्ज योजना या संदर्भात २०२१-२२ चा राज्य शासन निर्णय दिनांक ५ ऑगस्ट २०२१ ची माहिती या लेखात पाहणार आहोत.

New Updates पीक कर्ज योजना २०२१

राज्यात २०२१ मध्ये उद्भवलेल्या covid-19 परिस्थितीमुळे केलेल्या लॉक डाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी तसेच साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली लक्षात घेता, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिल्या गेलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दिनांक ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदत वाढ दिलेली होती.

डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना २०२१ माहिती

  • त्या शासन निर्णयामध्ये पीक कर्जाच्या वसुलीस दिलेल्या वाढीव मुदतीत कर्जाची संपूर्णपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येणार असे अनुज्ञेय करण्यात आले आहे.
  • शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना रुपये एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना मदत केली आहे. शासनामार्फत व्यापारी बँकांना दिला जाणारा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिले जाणारे २.५० टक्के व्याज परतावा यामुळे शेतकऱ्यांना ६ टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होत आहे. 
  • शेतकऱ्याने विहित मुदतीत परतफेड केली, तर केंद्र शासनाकडून ३ टक्के दराने आणि राज्य शासनाकडून एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ३ टक्के व्याज दराने आणि त्यापुढे रुपये तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी १ टक्का दराने व्याज अनुज्ञेय देण्यात येते. याप्रमाणे व्याज अनुदान आणि व्याज परतावा या दोन्ही योजनांमुळे रुपये एक लाखापर्यंत चे पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी उपलब्ध होत आहे.
  • याखेरीज शासन निर्णयामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसह व्याज परतावा योजना या योजनेचादेखील उल्लेख करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने खालील शासन निर्णय दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

                                                                      पीक कर्ज योजना

दुबार पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढ शासन निर्णय ५ ऑगस्ट २०२१

या वाढीव मुदतीत कर्जाची परतफेड करणारे शेतकरी हे शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. या ऐवजी या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा आणि व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवण्यास पात्र असतील. त्यामध्ये व्यापारी बँकांसाठी १ टक्का दराने आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी २.५ टक्के दराने लाभ मिळेल.

maharashtra shasan portal

या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी खालील GR पहा या बटणावर क्लिक करा आणि तो सविस्तरपणे पहा. 

Recent Posts

Leave a Comment

Translate »