New Updates प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना २०२१

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना  २०२१  याची माहिती पाहणार आहोत. भारत सरकारने हि योजना अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहायता प्रदान करण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल यांच्या द्वारे केली गेलेली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० रुपये (२००० च्या ३ हप्त्याने )जमा करणार आहे.

Contents hide

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना २०२१ चे उद्देश्य-

भारतातले ७५% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, यामध्ये अल्प भूधारक (२ हेक्टर/ ५ एकर शेतीयोग्य जमीन असणारे ) शेतकऱयांना या योजनेअंतर्गत वर्षाला ६००० एवढा निधी त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जेणेकरून पूर्णतः शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. अल्प भूधारक शेतकर्त्यांना उपजीविकेचे दुसरे साधन उपलब्ध नसते या केंद्र सरकारच्या योजनेमुळे गरीब अल्प भूधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात शासनाकडून मिळणार आहे. शेतकऱयांना सबळ बनवणे हे या योजनेमाघे केंद्र शासनाचे मुख्य उद्दिष्टय असणार आहे. देशातील  २ करोड गरीब शेतकर्त्यांना या योजेचा लाभ होणार आहे. या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी थेट शेतकऱयांच्या बँक अकाउंट मध्ये पोहचवण्याचा निर्णय घेतला आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2021 शेतकरी पात्रता नवीन घोषणा-

 • माननीय प्रधानमंत्री यांनी १७ व्या लोकसभा इलेक्शन नंतर या योजनेसंबंधी एक नवीन घोषणा केली आहे. त्यामध्ये या योजनेचे आधीचे क्षेत्र वाढवून जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याची घोषणा केली आहे. आत्ता  देशातल्या शेतकऱ्याकडे १ हेक्टर, २ हेक्टर, ३ हेक्टर, ४ हेक्टर, ५ हेक्टर कितीही शेती असली तरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांला लाभ घेता येणार आहे. आधीच्या नियमानुसार २ हेक्टर क्षेत्र मर्यादेतच लाभ घेता येणार होता.
 • शेतकर्‍याची जमीन शेतकर्‍याच्या नावे असावी.
 • जर एखादा शेतकरी शेती करीत असेल पण शेत त्याचे नाव नसेल तर तो लाभार्थी होणार नाही.
 • हजार रुपयांहून अधिक रक्कम मिळते, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
 • आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.
 • जर कुणाकडे शेत आहे, परंतु ते सरकारी कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्त झाले आहेत किंवा इतर कोणत्याही शासकीय पदावर आहेत, तर त्याचा काही फायदा घेता नाही.शेतकऱ्यांना  आत्ता 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना २०२१ लागणार दस्तावेज-

 • ७/१२ उतारा
 • आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • मोबाइल नंबर

PM kisan samman nidhi 2021 रजिस्ट्रेशन कुठे आणि कसे करायचे ?

या योजनेचा आत्तापर्यंत जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर लवकरच http://pmkisan.gov.in/ वर जाऊन तुमचे रेजिस्ट्रेशन करून घ्या. आणि या योजनेचा लाभ घ्या. रेजिस्ट्रेशन सध्या चालू आहे, अंतिम तारीख अद्याप आलेली नाही. तरी लाभ मिळत नसेल आणि घेयचा असेल तर रजिस्ट्रेशन करा.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ऑनलाईन अर्ज कुठे करावा नवीन घोषणा –

या योजनेच्या अर्ज हे ग्रामपंचायत आणि नगरपालिकाकडून ऑफलाईन स्वीकारले जात होते. सर्व राज्ये जिल्हानिहाय ग्रामपंचायतनिहाय महानगरपालिका निहाय शेतकर्‍यांची यादी तयार करीत आहेत. त्यांना केंद्राच्या सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत. पण आता जन सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकार लवकरच या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज मंजूर करणार आहे. 

pm kisan samman yoajna registration 2021

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नवीन अपडेट-

केंद्र सरकारने या योजनेंतर्गत नवीन अपडेटआणले आहेत. ज्या लोकांना या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२१ च्या अंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज केले गेले आहेत, त्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (ज्या लोकांना लाभ मिळण्यासाठी अर्ज केला आहे अशा शेतकऱयांना किसान क्रेडिट कार्ड घ्यावे लागेल. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांनी केलेला अर्ज मिळाल्यानंतर १४ दिवसांच्या आत बँकांना क्रेडिट कार्ड देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही केसीसी मोहीम ८ फेब्रुवारी २०२० पासून १५दिवस सुरू करण्यात आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana 2021 latest news –

अर्ज केला पण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एसएमएस आला नाही ?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ९ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात१८००० कोटी पाठविण्यात आले आहेत. आपल्याला त्याचा एसएमएस न मिळाल्यास काळजी करू नका. तथापि, पीएम किसान पोर्टलनुसार या योजनेंतर्गत आतापर्यंत११ कोटी ४७ लाख लाभार्थी तयार झाले आहेत. त्यानुसार सुमारे दोन कोटी २६ लाख शेतकरी ७व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
खात्यावर पैसे पाठविण्याची माहिती ग्राहकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाते. यासाठी, बँक खात्यात फोन नंबर लिंक करणे आवश्यक आहे. जर आपला फोन नंबर बँकेत नोंदणीकृत असेल तर आपण पैसे जमा करताच एसएमएस आपल्याकडे येतील.

अर्ज केलाय पण पैसे आलेले नाहीत?

जर आपण या योजनेत नोंदणीकृत असाल आणि आपल्या खात्यावर २००० रुपयांचा हप्ता नसेल तर आपण कॉल करून टोल फ्री क्रमांकावर चर्चा ठेवू शकता. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतक help्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. शेतकरी पंतप्रधान-किसान हेल्पलाईनवर १५५२६१ किंवा टोल फ्री १८००११५५२६ क्रमांकावर संपर्क साधू शकतात. शेतकरी ०११-२३३८१०९२ वर मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.

PM किसान सम्मान योजना रजिस्ट्रेशन मध्ये आधार क्रमांक चुकीचा झाला आहे किव्हा बँक खाते नंबर चुकीचा झाला आहे तर काय करावे?

जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करताना तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा झाला असेल ,तर तुम्ही तो दुरुस्त करू शकता . त्यासाठी खालील प्रमाणे जाऊन तुम्ही त्याच्यात दुरुस्ती करू शकता.

 • सर्वप्रथम तुम्ही या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर pmkisan.gov.in वर जावा.
 • संकेतस्थाळावर गेल्यावर वरच्या कोपऱ्यात तुम्हाला farmers corner असा एक ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा.
 • तुम्हाला तिथे एक आधार एडिट अशी एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हला क्लिक करायचे आहे.
 • ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही आधी भरलेला आधार नंबर दिसेल, त्यानंतर त्यावर तुम्ही क्लिक करून जो नंबर चुकीचा आहे तो दुरुस्त करू शकता.
 • आणि जर तुमच्या बँक खाते नंबर चुकीचा झाला असेल, तर तुम्हला कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. आणि बँक खाते नंबर मध्ये दुरुस्ती करून घ्यावी लागेल

किसान सम्मान निधीची रक्कम ६,००० ची होऊ शकते १०,००० नवीन अर्थसंकल्प २०२१-२२

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना एक नवीन भेट देऊ इच्छित आहेत. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी ची रक्कम वाढवून १०,००० होऊ शकते. या आधी हि रक्कम ६,००० होती जी ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात होती. १ फेब्रुवारी २०२१ रोजी नवीन वर्ष्याच्या नवीन अर्थसंकल्प निर्मला सीतारामन काढणार आहेत. सध्या त्या अर्थसंकल्पावर काम चालू आहे . शेतकऱ्यांवर अधिक अधिक लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे मोदी सरकार प्रधानमंत्री सम्मान योजानाची रक्कम वाढवू शकते. तज्ज्ञांच्या मते कृषी कायद्याविरोधासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सीतारामन आगामी आथिक बजेटमध्ये हा निर्णय घेऊ शकते आणि ती रक्कम वाढून १०,००० होऊ शकते. शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली होती कि ६००० रक्कम हि शेतीसाठी पुरेशी नाही ती वाढवण्यात यावी. याचा विचार आगामी आर्थिक बजेट बनवताना सरकार नक्कीच करणार आहे. सरकारच्या नवीन अर्थसंकल्पनुसार किसान सम्मान निधी योजनेच्या बजेट २०२१-२२ मध्ये नक्कीच वाढ होईल.

Recent Posts

Leave a Comment

Translate »