पीक विमा 2022 महाराष्ट्र शासन निर्णय | Pik Vima 2022 Maharashtra | Pantpradhan Pik Vima Yojana 2022 | pmfby 2020-21 list
Pik Vima Nuksan Bharpai Anudan Yojana 2022 GR Maharashtra (पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2022): नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये नुकसान भरपाई अनुदान योजना 2022 महाराष्ट्र शासन निर्णय माहिती पाहणार आहोत.
राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय जीआर 15 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. त्याची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

पीक विमा नुकसान भरपाई योजना 2022
राज्यात माहे डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांची नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले होते. त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तामार्फत पाठवण्याच्या सूचना शासन देण्यात आलेले होते. या सूचनानुसार पंचनामे झाल्यानंतर ते 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडून दिनांक 15-9-2020 व दिनांक 17-7-2020 पत्रान्वय प्राप्त झाला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 16-12-2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये मदत अनुदेय करण्यात आलेली आहे.
PMFBY 2022-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा 2020-21 पासून 3 वर्ष्यांसाठी माहिती
पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2022
माहे फेब्रुवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयान्वये एकूण 247 कोटी 76 लक्ष 52 हजार इतका निधी सर्व विभागीय आयुक्तामार्फत करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी विभागीय आयुक्त अमरावती यांनी अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या 18236 एकूण बाधित क्षेत्र 10913.56 यासाठी रुपये 1884. 51 लक्ष इतक्या निधीची मागणी केली. विभागीय आयुक्त अमरावती यांच्या 13/07/2020 पत्रानुसार सुधारित प्रस्ताव सादर केला. तसेच अमरावती जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या १८५२५ एकूण बाधित क्षेत्र ११७६.९३ यासाठी रु 1923.32 लक्ष इतक्या निधीची सुधारित मागणी केलेली आहे.
शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत वाटप करताना खालील दक्षता घेण्यात येतील.
- प्रचलित नियमानुसार शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानिकरीता मदत ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान देय राहील.
- प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी अंतर्गत केले जाईल.
- बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
- कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत दिली जाणार नाही.
- मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीचा रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित केले जातील.
- मदतीचे वाटप करताना मदतीची द्विरुक्ति होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
अर्ज सुरु खरीप पीक विमा अनुदान योजना 2022 संपूर्ण माहिती
बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रुपये 38 लक्ष 80 हजार इतका निधी मागणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य पुर, चक्रीवादळे अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान करिता शेतकऱ्यांना मदत सहाय्यक अनुदानित या लेखाशीर्षाखाली सन 2022- 23 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या निधीमधून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. हा निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त मार्फत वितरित करण्यात येईल.
या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी आणि याची सत्यप्रतता तपासण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन हा शासन निर्णय पाहू शकता. तसेच तुम्ही खालील लिंक वर जाऊन देखील हा पीक विमा नुकसान भरपाई अनुदान शासन निर्णय जीआर पीडीएफ पाहू शकता.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202207151117332419.pdf
PIk Vima 2022 Maharashtra GR
जून ते ऑक्टोबर 2020 कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरित करण्यात आलेल्या दिनांक 15 जुलै 2022 शासन निर्णय GR PDF
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202207151121323119…pdf
- मृदा आरोग्य कार्ड योजना 2023 महाराष्ट्र माहिती
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी ३०,०००/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी २०,०००/-कामगार योजना २०२३ महाराष्ट्र फायदे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना शासन निर्णय GR PDF
- ६२.५० कोटी कांदाचाळ उभारणी प्रकल्प निधी मंजूर जीआर
- समाज कल्याण हॉस्टेल योजना GR