नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना 2025 लिस्ट अपडेट(Kusum Solar Yojana 2025 List)कुसुम सोलर योजना 2025 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.
मित्रांनो मेडा कडून ज्यांनी कुसुम योजनेसाठी अर्ज भरलेला होता, त्यांना टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे. ज्यांची कुसुम योजनेअंतर्गत केलेल्या अर्जामध्ये निवड झालेली आहे, त्यांना हा मेसेज आलेला आहे. तुम्ही स्क्रीन शॉट मध्ये देखील पाहू शकता तो मेसेज काय आहे.

कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जांना एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्सा रुपये तेरा हजार चारशे रुपये भरणा ऑनलाईन सात दिवसाच्या आत जमा करायचा आहे. अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी कुसुम योजनेअंतर्गत निवड झालेल्या अर्जदारांना लाभार्थ्यांना आलेला आहे.
कुसुम सोलर योजना 2025 ऑनलाईन लिस्ट कशी बघायची?
- सर्वप्रथम तुम्हाला मनरे च्या पीएम कुसुम वेबसाईट वर जायचे आहे.
- तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून तेथे जाऊ शकता. – PM Yojana List Link

- आत्ता तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
- त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे.
- तुम्ही ज्या HP पम्पासाठी अर्ज केलेला होता तो निवडायचा आहे.

- भरून झाल्यावर तुम्हला Go या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करायचे आहे.
- आत्ता तुमच्यापुढं कुसुम सोलर ची तुमच्या जिल्ह्याची लिस्ट उघडेल.

- त्या लिस्ट च्या वरची तुम्हाला एक सर्च बटन दिसेल, त्याच्या पुढच्या रकान्यात तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे.

- जर तुमचं नाव यादीत असेल तर, तुम्हाला तुमचं नाव खाली पाहायला मिळेल.
- अश्या प्रकारे तुम्ही सोलर कृषी पंपासाठी तुमची निवड झाली आहे का ते तपासू शकता.
- मित्रांनो तुमची जर निवड झालेली असेल तर तुमच्या मोबाइलला नंबर देखील MEDA करून टेक्स्ट येईल.
अधिक update साठी महासरकरी योजना चॅनल, telegram group ला follow करा.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana