प्रात्यक्षिकांसाठी ड्रोनची खरेदी साठी आर्थिक सहाय्य 31 मार्च, 2023 पर्यंत लागू राहील. भारतीय कृषि अनुसंधान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विदयापीठ यांना शेतकऱ्यांचे शेतावर प्रात्यक्षिके घेण्यासाठी ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी ( 100 टक्के रु. 10.00 लाख यापैकी जे कमी असेल ते) अनुदान उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनी यांना शेतकऱ्याचे शेतावर प्रात्यक्षिके घेण्यासाठी ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी ( 75 टक्के ) अनुदान उपलब्ध आहे.

उद्दिष्टे
- कृषी क्षेत्राची उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढवणे.
- कृषी ड्रोन शेतकऱ्याला विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि संबंधित निवडी करण्यास सक्षम करते.
- पीक आरोग्य आणि पीक उपचारांचे नियमन.
- पीक पद्धतीवर आधारित दृष्टिकोनावर मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिके आयोजित करणे.
- शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी.
- सुधारित/नवीन विकसित ड्रोन आधारित कृषी पद्धतींचा परिचय करून देणे.
- पीक उत्पादन / काढणीपश्चात व्यवस्थापन प्रणालीमध्ये कस्टम हायरिंग सेंटर्सच्या सहभागासह प्रात्यक्षिके आयोजित करणे.
ड्रोन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- शेतकरी उत्पादक कंपनी
- शेतकऱ्यांची सहकारी संस्था
- ग्रामीण नव उदयोजक
- कृषि पदवीधारक
- अस्तीवात असलेली औजारे बँक इ. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी अर्थसहाय्य लाभ घेऊ शकतील.
अंमलबजावणी संस्था
- FMTTIs
- ICAR संस्था
- KVKs
- FPOs
- SAUs
ड्रोन अनुदानासाठी अर्ज कुठे करावा?
पात्र लाभार्थीसठी अर्जाचा नमुना तालुका कृषि अधिकारी यांचेकडे उपलब्ध आहे. तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा.