राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२१-२२ मध्ये राबवण्यासाठी मंजूर झालेल्या प्रशासकीय आणि वित्तीय मान्यते संबंधीचा दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची माहिती आज या लेखात पाहणार आहोत.
कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१-२२
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत कृषी शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानातील घटक क्रमांक ३ अनुसार वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्र किंवा अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देणे आणि घटक क्रमांक ४ नुसार कृषी अवजारे किंवा यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करावयाची आहे. सदर घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जाणार आहे.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये रुपये पंधरा हजार लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार ६० टक्के च्या मर्यादित रुपये नऊ हजार लक्ष सुधारित तरतूद करण्यात आली आहे. या सुधारित तरतुदीनुसार रुपये नऊ हजार लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील शासन निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना २०२१ -online अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र
शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र शासन निर्णय २६ ऑक्टोबर २०२१
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये ९ हजार लक्ष म्हणजेच ९० कोटी इतक्या रकमेच्या कार्यक्रमास शासन निर्णयान्वये प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर योजने अंतर्गत ट्रॅक्टर बाबीसाठी अनुसूचित जाती किंवा जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ४० टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ते या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
असा हा शासन निर्णय दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील कृषी यांत्रिकीकरण योजना जीआर २०२१ या बटणावर क्लिक करा.
- अर्ज भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना 2023
- पीएम वाणी योजना 2023 रजिस्ट्रेशन: फ्री वाय फाय स्कीम
- Mahadbt Farmer Tractor: राज्य सरकार कृषी यांत्रिकरण योजना 2023
- Gharkul Yadi 2023: ग्रामपंचायत Gharkul Yojana Yadi 2023 ऑनलाइन कशी बघायची?
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?