शेतकऱ्यांसाठी बियाणांच्या उत्पादनाबाबत नवीन शासन निर्णय ३ जून २०२१

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी नव्याने विकसित झालेल्या अधिक उत्पादनक्षम वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी उत्पादन साखळीमध्ये पैदासकर पायाभूत प्रमाणित बियाणे देखील आवश्यक त्या प्रमाणामध्ये बियाणे उपलब्ध होणे आवश्यक आहे. पैदासकर बियाणांच्या कमी उपलब्धतेमुळे प्रमाणित बियाणांच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच प्रमाणित बियाणे यांच्या उपलब्धते अभावी शेतकऱ्यांना नाईलाजाने बाजारात उपलब्ध असलेल्या सत्यप्रत बियाणे किंवा सरळ वाणांच्या बियाणांवर अवलंबून राहावे लागते. याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होऊन पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये ही घट येते.

Translate »