७७ कोटी ७८ लाख बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२०-२१ निधी शासन मंजुरी
शासन निर्णयानुसार ७७ कोटी ७८ लाख एवढ्या निधीस शासन निर्णय १२ फेब्रुवारी २०२१ प्रशासनाकडून मान्यता दिली गेली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ११६.०९ कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीय केला गेलेला आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० च्या शासन परिपत्रकानुसार वरील निधीपैकी ३३ टक्के म्हणजेच ३८ कोटी ३१ लाख एवढ्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ७७ कोटी ७८ लाख निधीस मान्यता द्यावी अशी विनंती कृषी आयुक्त यांनी केली होती.