डॉ. पंजाबराव देशमुख अंतर्गत राज्य पुरस्कृत सेंद्रिय शेती अंतर्गत जैविक शेती मिशन

हे मिशन सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त शेती होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात राबवले जात आहे. अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, आणि तणाव नाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनीत मृतवत होत चाललेल्या आहेत. त्यामुळे मानव व पशुपक्षी यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहेत. यामुळेच कॅन्सरसारखे गंभीर आजार मानवास मोठ्या प्रमाणात होत आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये अनेक शेतमजूर आणि शेतकरी यांना किटकनाशकांची विषबाधा होऊन ते मृत्युमुखी पडले पडले आहेत. तसेच रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनी कठीण होत आहेत. त्यामुळे मशागतीचा खर्चात वाढ झाली आहे.

Translate »