पीएम स्वामित्व योजना मराठी माहिती: प्रॉपर्टी कार्ड, बँक कर्ज, ऑनलाईन जमिनीचे रेकॉर्ड

पंतप्रधान स्वामीत्व योजना काय आहे, त्याचे फायदे, स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड काय आहे, पात्रता, वैशिष्ट्य, सर्वेक्षण प्रक्रिया, संपर्क या सर्व गोष्टींची मराठी माहिती या लेखात पाहणार आहोत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी एक प्रकारची ऑनलाइन योजना सुरू ठेवत आहेत. याच डिजिटल इंडियाला वाढवण्यासाठी पंतप्रधान पीएम मोदी यांनी ग्रामीण स्वामीत्व योजना सुरू केली. स्वामीत्व योजनेअंतर्गत, पीएम मोदींनी एक नवीन ई-ग्राम स्वराज पोर्टल सुरू केले आहे. पंचायती राज मंत्रालयाने ई-ग्राम स्वराज पोर्टल सुरू केले आहे . ग्रामीण समाजाशी संबंधित सर्व समस्यांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जमिनीची माहिती ऑनलाइन पाहू शकतील.

Translate »