स्वाधार योजना माहिती मराठी 2024: नमस्कार मित्रांनो , आज आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण स्वाधार योजनेचे उद्दिष्ट्य, गरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ, समाज कल्याण वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा, निवडप्रक्रिया, स्वाधार योजना 2024 मंजूर यादी, आवश्यक कागदपत्रे, अटी, निकष, पात्रता या सर्व घटकांची माहिती पाहणार आहोत.
स्वाधार योजना माहिती मराठी 2024
दिवसेंदिवस वाढत चाललेली व्यवसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वस्तीग्रह यांची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र स्वाधार योजना चे उद्दीष्ट
राज्यातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन, राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, गरीब अनुसूचित जाती, नव बौद्ध प्रवर्गातील ११ वी, १२ वी, डिप्लोमा, ग्रॅड्युएशन इत्यादी शिक्षणासाठी प्रति वर्ष ५१ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. जेणेकरून राज्यातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. राज्यातील गरीब अनुसूचित जाती, नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी हि शिक्षण घेऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवने हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
Pandit Dindayal Yojana: दीन दयाल उपाध्याय स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना Apply 2024
स्वाधार योजना माहिती मराठी 2024 लाभ
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर म्हणजेच इयत्ता अकरावी, पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी शासकीय वस्तीग्रह प्रवेशिका असणाऱ्या विद्यार्थ्यांना खर्चासाठी खालील प्रमाणे रक्कम ही त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येईल.
स्वाधार योजना 2024 मंजूर यादी
- अपूर्ण भरलेल्या फॉर्म आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज हे रद्द करण्यात येतील.
- ६० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५०टक्के असणार आहे.
- अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना हा लाभ घ्यावा. याचा ही संख्या निश्चित केलेली असून, त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- स्वाधार योजना 2024 मंजूर यादी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिद्ध केली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांची पात्रता
- स्वाधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गातील असला पाहिजे.
- त्याने जातीचा दाखला सादर करणे हे बंधनकारक असणार आहे.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न असणे बंधनकारक असणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार पेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
- स्वाधार योजना लाभार्थी अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी लाभार्थी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असणारा आवश्यक असणार आहे.
- लाभार्थी विद्यार्थ्यास अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास किमान ६० टक्के गुण असणे आवश्यकअ सणार आहे.
- इयत्ता बारावी नंतर वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या बारावी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी विद्यार्थ्यास दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान ६० टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रॅज्युएशन सीजीपीए चे गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने राज्य शासन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद किंवा वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद व वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी लाभार्थी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असणे अनिवार्य आहे.
50% सबसिडी समाजकल्याण शिक्षण कर्ज योजना संपूर्ण माहिती | LIDCOM Education Loan Scheme
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांची निवडप्रक्रिया खालीलप्रमाणे
- विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
- निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील.
- स्वाधार योजना यादी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण असेल.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी ची मर्यादा ५०टक्के इतकी असेल.
- प्रवेशित विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल निकाल लागल्यापासून पंधरा दिवसाच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.
- सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमाचा कालावधी पर्यंतच देय राहील या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त ७ वर्षापर्यंतच घेता येईल.
- विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन, स्वाधार योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास, तो कारवाईस पात्र राहील. तसेच त्याला दिलेल्या रकमेच्या १२ टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
- या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्ष ६०टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा तो स्वाधार योजनेस पात्र असणार नाही.
स्वाधार योजना माहिती मराठी 2024 ची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र
- बँक खाते
- जात प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
समाज कल्याण हॉस्टेल योजना : 800/- भत्ता | सर्व प्रवर्गातील विद्यार्थी करू शकतात अर्ज
स्वाधार योजना 2024 अर्ज कसा करावा?
- या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित असलेल्या महाराष्ट्रातील लाभार्थी विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे अर्ज करावा.
- प्रथम, अर्जदारास महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
- या होम पेजवर आपणास स्वाधार योजना पीडीएफ वर क्लिक करावे लागेल.
- तेथून अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, आवश्यक सर्व कागदपत्रांची छायाचित्र प्रत अर्जासह जोडावी लागेल.
- तो अर्ज कागदपत्रासह संबंधित जिल्याच्या समाज कल्याण कार्यालयात जमा करावी लागेल.
- अशा प्रकारे स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी 30,000/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी 20,000/-Bandhkam Kamgar Yojana 2024 महाराष्ट्र फायदे