आमच्याबद्दल

village farmer

राज्यातील तळा गाळातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजना पोहचणे, हे आमच्या वेबसाइट चे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून आपला एकही शेतकरी बांधव यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. तसेच मंत्री मंडळातील शेती विषयक निर्णय शेतकऱ्यांना  माहित असणे आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो आणि त्यांना समजेल अश्याच भाषेत ही माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

शेवटी एवढाच ध्यास आहे की, महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील कोणताही शेतकरी या माहितीपासून वंचित राहू नये. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपली शेती आधुनिक करून दर्जेदार उत्पन्न काढावे, हीच आमची मनापासून इच्छा आहे. शेवटी शेतकऱ्याचा विकास झाला, तरच देशाचा विकास संभव आहे. या वेबसाइट मधील सर्व महिती ही इतर वेबसाइट चा अभ्यास करून सर्व माहिती एकत्र केलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अपूर्ण माहिती मिळू नये. एखादी योजना आमच्या वेबसाइट वर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या योजने संदर्भात अधिक माहिती शोधण्यासाठी दुसरीकडे जाण्याची काहीही गरज नाही अशी परिपूर्ण माहिती आम्ही उपलब्ध करून देत आहोत. तेही आपल्या शेतकरी मित्रांना समजेल अश्या सध्या आणि सरळ भाषेत. गरीब आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा जोपर्यंत विकास होत नाही, तोवर आमचे काम चालूच असणार आहे.