PM Vishwakarma yojana Maharashtra अर्ज सुरु: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेसंबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर ही योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, त्याची शेवटची तारीख (Last Date) कधी असणार आहे? विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Document कागदपत्रे कोणती? पात्रतेच्या अटी कोणत्या? विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Maharashtra अर्ज कुठे करायचा? या योजनेचा लाभ घेऊ शकतो? विश्वकर्मा योजना महाराष्ट्र PDF, योजनेचे फायदे कोणते? यासंदर्भात संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
PM विश्वकर्मा योजना मराठी | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना Maharashtra
- पीएम विश्वकर्मा ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कारागीर आणि कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन आणि बाजारासाठी सर्वांगीण आणि शेवटपर्यंत समर्थन देण्यासाठी सुरू केलेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे.
- या योजनेअंतर्गत सुतार,लोहार व बलुतेदारीतील इतर वरील समाजांतील कारागिरांना ६ दिवसांचे आपल्या व्यवसायाचे प्रशिक्षण (ट्रेनिंग)दिले जाईल. दररोज ५०० रु.मानधन मिळेल.
योजनेचे उद्दिष्ट काय?
- पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
- कौशल्य अपग्रेडेशन
- टूलकिट प्रोत्साहन
- क्रेडिट सपोर्ट
- डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन
- विपणन समर्थन
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कोणासाठी आहे?
- सुतार
- लोहार
- चांभार
- न्हावी
- शिल्पकार (मूर्तिकर) / दगड कोरणारा / दगड तोडणारा)
- धोबी
- शिंपी
- मिस्त्री
- हॅमर आणि टूल किट मेकर
- कुंभार
- सोनार
- बाहुली आणि खेळणी बनविणारा
- बास्केट मेकर/ बास्केट वेव्हर: मॅट मेकर/ कॉयर वीव्हर/ ब्रूम मेकर
- फिशिंग नेट बनविणारा
- हार बनविणारा.
- शिल्पकार इ.सर्व कारागीरांसाठी आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता अटी
- स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि वरीलपैकी एक कुटुंब-आधारित पारंपारिक व्यवसायात गुंतलेला कारागीर किंवा कारागीर, पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल.
- अर्जदाराने नोंदणीच्या केल्याच्या तारखेला लाभार्थीचे किमान वय १८ वर्षे असावे.
- लाभार्थी नोंदणीच्या तारखेला संबंधित व्यापारात गुंतलेला असावा. अर्जदाराने स्वयंरोजगार/व्यवसाय विकासासाठी गेल्या 5 वर्षांत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम क्रेडिट-आधारित योजनांतर्गत कर्ज घेतलेले नसावे. उदा. PMEGP, PM SVANidhi, Mudra.
- योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील. योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असलेले ‘कुटुंब’ असे परिभाषित केले आहे.
- सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेंतर्गत पात्र असणार नाहीत.योजनेचे लाभ कोणते?
- ट्रेनिंग संपल्यावर केंद्रशासनाचे आपल्या धंद्याचे प्रमाणपत्र मिळेल व हत्यारे घेण्यासाठी १५००० /- रु.मिळतील.
- भांडवलासाठी वार्षिक ५ रु.शेकडा या दराने १ लाख रु.कर्ज मिळेल. ते कर्ज फेडल्यानंतर २ लाख रु.कर्ज ५ रु.शेकडा या दरानेच मिळेल.
- कारागिरांचा वस्तुला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. आधुनिक तंत्रकौशल्ये प्राप्त होतील. उत्पादनाचा दर्जा वाढेल. त्यामुळे रोजगार वाढेल.
PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना फाॅर्म कसा भरावा ?
- फाॅर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती www.pmvishwakarma.gov.in या पोर्टलवर नोंदणी करू शकते. Form सायबर कॅफेत जाऊन /सेतुकार्यालयात जाऊन ऑनलाईन Form भरावा लागेल.
- या संधीचा तुम्ही फायदा घ्या व पात्र सर्व सुतार, लोहार, सोनार,तांबट,पाथरवट(शिल्पी) कुंभार, नाव्ही, धोबी, शिंपी,शिल्पकार वर्गातील इतर सर्व कारागिरांनाही अवश्य ऑनलाइन फॉर्म भरून लाभ घ्यावा.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Document
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- जात प्रमाणपत्र(प्रांत अधिकारी यांनी दिलेले)
- उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
- बॅंक पासबुक व बॅंक शिल्लक प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला (तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी दिलेला)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईजचा फोटो.
- रेशनकार्ड.
संपर्क कुठे करायचा?
अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राला अथवा खादी ग्रामोद्योग केंद्राला अवश्य भेट द्या.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana