मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Online Apply App: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण नारीशक्ती दूत एप्लीकेशन वर ऑनलाईन अर्ज आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ची प्रक्रिया काय असणार आहे त्या संबंधित देखील माहिती पाहणार आहोत. सध्याच्या update नुसार तुम्हाला कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत, अर्ज हमीपत्र कस डाउनलोड करायचं हे देखील पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला यामध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस सांगितली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारीशक्ती दूत ऑनलाइन अर्ज
ऑफलाइन अर्जाच्या गर्दीमुळे आजकाल आपल्या लाडक्या बहिणी घरबसल्या नारीशक्ती दूध द्वारे आपले ऑनलाईन अर्ज सादर करत आहेत. त्याची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे सध्या अंगणवाडी केंद्रावर अर्ज स्वीकारले जात आहेत. बहुतांश महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यामुळे अंगणवाडी केंद्रात जाऊन देखील तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकणार आहात. जर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल तर तुम्ही ऑनलाईन मोबाईल द्वारे देखील तुमचा स्वतःचा अर्ज लाडक्या बहीण योजनेसाठी भरू शकणार आहात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना News Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मागे घेण्यात आलेल्या शासन निर्णय मध्ये बदल करण्यात आलेला होता. आता महिला लाभार्थ्याला रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्यासाठी धावफळ करण्याची गरज नाही. मात्र अजूनही अनेक जण नारी शक्ती दूत App वापरण्याऐवजी ऑफलाइन अर्ज करत आहेत.
सध्या हे अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रावरच स्वीकारले जात आहेत. बहुतांश महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे मोबाईल नाही त्यामुळे त्यांनी स्वतःचा अर्ज अंगणवाडी केंद्रावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आतापर्यंत सुमारे 8000 अर्ज हे प्राप्त झालेले आहेत आणि त्याची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. अंगणवाडी सेविकांकडून ऑफलाइन केलेले अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड केले जात आहेत. अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यांना पात्र प्रति पात्र अर्ज पन्नास रुपये एवढे दिले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा पर्याय असूनही उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता कायम आहे त्यामुळे अनेकांना जुनी शिधापत्रिका जन्म प्रमाणपत्रे किंवा शाळा सोडला दाखला ऑफलाइन सबमिट करावा लागतो. या लाभार्थ्यांना त्यांची छाया पत्रे अपलोड करण्यासाठी पुन्हा भेट द्यावी लागणार आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
नारीशक्ती दूत ऑनलाईन अर्ज करण्याच्या स्टेप्स
- सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जावं लागणार आहे आणि नारीशक्ती दूत ॲप हे डाऊनलोड करावे लागणार आहे. त्याची लिंक खाली देखील दिली जाईल तिथून देखील तुम्ही हा हे ॲप डाऊनलोड करू शकणार आहात.
- ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचा आहे. स्किप वर क्लिक करायचं आहे.
- आत्तातुम्हाला त्या ठिकाणी लॉगिन करायचा आहे. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल त्या ठिकाणी द्यायचा आहे.
- तुमची श्रेणी त्या ठिकाणी निवडायचे आहे. जसे की सामान्य महिला किंवा गृहिणी अशी तुमची श्रेणी त्या ठिकाणी निवडायची आहे.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळणार आहे. तो तुम्हाला त्या रकान्यामध्ये भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे. आता तुमची प्रोफाइल ही तयार होईल.
- अर्ज भरताना तुम्हाला अर्ज भरा नारीशक्ती दूत पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यामध्ये तुम्हाला सर्व तुमचा वैयक्तिक तपशील, bank details भरायचा आहे.
- आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला आधार कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि हमीपत्र देखील अपलोड करायचा आहे आणि अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक तुमचा फोटो देखील तिथं गरजेचा आहे.
- तुमच्याकडे हमीपत्र नसेल, तर खालील लिंक वर जाऊन तुम्ही तिथून हमीपत्र डाऊनलोड करू शकता त्या ठिकाणी ऑफलाइन अर्ज देखील आहे तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल किंवा हमीपत्र हवा असेल तर तुम्ही तिथून जाऊन ते हमीपत्र व्यवस्थित रित्या भरून त्या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात.
- त्यानंतर तुम्हाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे आणि त्याचा एक स्क्रीन शॉट घ्यायचा आहे तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे याचा स्क्रीन शॉट तुम्ही तुमच्याकडे ठेवायचा आहे.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड + अर्ज Form PDF Link
अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र कोणकोणती असणार आहेत
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र (तुम्हाला पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागणार आहे)
- उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये तुम्हाला अडीच लाखाच्या उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे. जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी जोडू शकणार आहात.
- तुम्हाला स्वघोषणापत्र लागणार आहे ज्यामध्ये घोषणापत्र हे तुम्ही लिहून त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा आहे.
- त्याचप्रमाणे बँक पासबुक आणि तुमचा अलीकडील काळातील फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे.
अर्ज झाल्यानंतरची प्रक्रिया काय?
एकदा का तुमची सर्व कागदपत्र अपलोड करून झाली आणि अर्ज व्यवस्थित रित्या भरून झाला तर त्यानंतरची प्रक्रिया काय असणार आहे. तर हा जो अर्ज आहे तो अर्ज पडताळणीसाठी तालुकास्तरावरील समित्यांमार्फत त्यांची पडताळणी केली जाणार आहे. या समित्यांमध्ये एक अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्यांचा समावेश होणार आहे. समित्या स्थापन झाल्यानंतर अर्जांची व्यवस्थितरित्या वेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी जास्त गर्दीमुळे अर्ज सादर करताना त्रुटी देखील येऊ शकणार आहेत.
या योजनेसाठी जास्त लोकांची अर्ज भरण्यासाठी गर्दी असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरत्यावेळी तुम्हाला काही त्रुटी येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला हा ऑनलाइन अर्ज शक्यतो रात्रीच्या वेळी भरायचा आहे. जर दिवसा तुम्हाला काही त्रुटी येत असतील तो तर तो शक्यतो रात्रीच्या वेळेस पुन्हा भरण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. या योजना संबंधीच्या संपूर्ण अपडेट साठी या वेबसाईटला तुम्हाला फॉलो करायचा आहे. टेलिग्राम ग्रुप आणि युट्युब चॅनेल ला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे.
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- या योजनेअंतर्गत सरकार देतंय तुमच्या लग्नासाठी 30,000/-, पत्नीच्या बाळंतपणासाठी 20,000/-Bandhkam Kamgar Yojana 2024 महाराष्ट्र फायदे