मूग, उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. मूग आणि उडीद खरेदी १० ऑक्टोबरपासून सुरू होईल, तर सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी
किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेंतर्गत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ) वतीने ऑनलाइन नोंदणी करावी. जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करून तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
खरेदीची तारीख:
- मूग, उडीद खरेदी: १० ऑक्टोबरपासून
- सोयाबीन खरेदी: १५ ऑक्टोबरपासून
खरेदी केंद्रांमध्ये मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ, लोहा तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था देगलूर आणि इतर केंद्रे समाविष्ट आहेत. मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीनसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.
हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधारकार्ड
- राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, ज्यावर अकाउंट नंबर आणि IFSC कोड स्पष्ट दिसावा
- ऑनलाइन पीक पेरा असलेला सातबारा उतारा
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ या हंगामात नाफेड अंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी राज्य शासनाने पणन महासंघाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. खरेदीसाठी १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित केला आहे, आणि १ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली आहे.
हमीभाव खरेदीसाठी शेतकरी ऑनलाइन नोंदणी
“ई-समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नोंदणी खरेदी केंद्राकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करू नये. शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावरून जाऊन नोंदणी करावी. केंद्रावर जाताना ई पीक पाहणी केलेला सातबारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावं,
राज्यात एकूण २०० खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाफेडची १४६ आणि एनसीसीएफचे ६० खरेदी केंद्र करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुका ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी तालुका गाठवा लागणार आहे,
खरेदी उद्दिष्ट:
पीक | प्रति क्विंटल दर (₹) | खरेदी उद्दिष्ट (मे.टन) |
---|---|---|
मूग | ८६८२ | १७,६८८ |
उडीद | ७४०० | १,०८,१२० |
सोयाबीन | ४८९२ | १३,०८,२३८ |
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती