नमस्कार शेतकरी बांधवांनो , कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा घटक मंजूर करण्यात आला आहे —
रुंद सरी वरंबा (BBF) यंत्र अनुदान योजना! या योजनेत नेमकं काय मिळणार? किती अनुदान मिळेल? आणि अर्ज कसा करायचा? चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अ) उद्देश :-
१) रुंद सरी वांब पद्धतीने (BBF) पेरणी करून जास्त/कमी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करणे.
२) शेतजमिनीतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
३) मृदसंवर्धन व जलसंवर्धन करण्यास प्रोत्साहन देणे.
४) शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे.
ब) रुंद सरी वांब (BBF) यंत्र वापराचे फायदे :-
१) अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होत असल्याने पिकांचे नुकसान कमी होते.
२) मृदधूप नियंत्रणामुळे कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
३) हवा खेळती राहते व पिकांची वाढ चांगली होते.
४) प्रति रुंद सरी वांब (BBF) एका हंगामात साधारण १०० हेक्टर क्षेत्र पेरणी करता येईल. त्यानुसार सुमारे 25,000 BBF यंत्रांचा पुरवठा राज्यातील शेतकऱ्यांना केल्यास राज्यात 25 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले जाईल व बियाणे, खते व कीटकनाशकांचा वापर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी होईल.
५) एकाच वेळी पेरणी, वखरणे व वरंबा तयार करणे शक्य होते.
६) कमी मजूर लागत असल्यामुळे वेळेवर काम करणे शक्य होते व वेळ व खर्चात बचत होते.
७) 25 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची पारंपरिक पद्धतीशी तुलना केल्यास उत्पादकता १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकते.
क) लाभार्थी :-
१) वैयक्तिक शेतकरी
२) शेतकरी गट
३) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)
४) कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था
ड) योजनेंतर्गत लाभार्थी निवड निकष :-
१) स्वतःच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे व स्वतःच्या नावाचे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावाचे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
२) शेतकरी गटाच्या बाबतीत गटातील किमान एका सदस्याच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
ई) लाभार्थी निवड कार्यपद्धती :-
१) रुंद सरी वांब (BBF) यंत्रासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी Mahadbt पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत नवीन सुविधा विकसित करून अर्ज करणे आवश्यक आहे. निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर केली जाईल.
२) सदर यंत्र पुरवठ्याचे इतर निकष कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेंप्रमाणे लागू राहतील.
फ) खर्च व अनुदानाचे स्वरूप :-
१) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM) अंतर्गत रुंद सरी वांब (BBF) यंत्रासाठी यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रुपये 70,000/- इतके अनुदान देय आहे.
२) एकूण 25,000 रुंद सरी वांब (BBF) यंत्रांसाठी जास्तीत जास्त रुपये 175.00 कोटी इतका निधी मंजूर करण्यात येईल.
ग) अनुदान वितरण कार्यपद्धती :-
१) Mahadbt पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येईल.
२) पुढील कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर करण्यात येईल.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती