Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Posted on February 14,February 14, by Mahasarkari Yojana

महाराष्ट्र शासनाच्या कृषी समृद्धी योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे खोडकामासाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, जलसंचय वाढविणे आणि उत्पादनात वाढ करणे हा आहे.

🔹 शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ₹66,633/- पर्यंत अनुदान
🔹 14,000 शेततळे खोडकामास मान्यता
🔹 पात्रता निकष व तांत्रिक अटी
🔹 अर्ज प्रक्रिया (Mahadbt Portal)
🔹 लाभार्थी निवड प्रक्रिया
🔹 शेततळ्याचे फायदे

या Blopostमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत.

Contents hide
1 वैयक्तिक शेततळे:-
1.1 कृषी समृद्धी योजना 2026 : रुंद सरी वरंबा यंत्रावर 50% अनुदान
1.2 Related

वैयक्तिक शेततळे:-

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण व वेळेच्या अनिश्चिततेमुळे पाण्याच्या कमतरतेने पिकांचे नुकसान होते. शेततळे हे या समस्येवरील उपाय म्हणून उदयास येत आहे. या बाबीचा विचार करून आयुक्तालयाकडून प्रस्तावित १४००० शेततळे खोडकामासाठी मान्यता देण्यात येत आहे.

कृषी समृद्धी योजना 2026 : रुंद सरी वरंबा यंत्रावर 50% अनुदान

सद्यस्थितीत शेततळ्यांची विविध आकारमानाचे आठ प्रकार प्रचलित आहेत. यापैकी लाभार्थ्यांनी जरी विविध आकाराची शेततळे घेतली तरी, जास्तीत जास्त मध्यम आकाराच्या (२५ X २० X ३ मीटर) शेततळ्यासाठी अनुज्ञेय असलेले रु. ६६,६३३/- प्रति शेततळे अनुदान अनुज्ञेय असेल. अशाप्रकारे एकूण १४००० शेततळे खोडकामासाठी अधिकतम रु. ९३.०० कोटी निधी देय राहील.


अ) उद्दिष्टे:-

१. शेतकऱ्यांना शेततळे खोडण्यास प्रोत्साहन देऊन मूळस्थानी जलसंचय करणे व महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकणे.
२. पिकांसाठी संरक्षित सिंचनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
३. अवर्षणग्रस्त भागात पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत पाणी उपलब्ध करून उत्पादनात वाढ करणे.
४. शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करणे.


ब) शेततळ्यामुळे होणारे फायदे :-

अनियमित पावसावर मात : पावसाचे पाणी साठविल्याने ते दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांना जीवनदायी ठरू शकते.

➤ संरक्षित सिंचन आणि उत्पादनात वाढ : पिकांना गरजेनुसार पाणी मिळाल्याने पीक नष्ट होण्यापासून वाचते, अपेक्षित उत्पादन मिळते, तसेच पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामातही नगदी पिके घेणे शक्य होऊन पिकांची घनता (Cropping intensity) वाढते.

रब्बी हंगामातील अतिरिक्त सिंचनाचे क्षेत्र वाढ : एका शेततळ्यामुळे साधारणतः १ हेक्टर संरक्षित सिंचनाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त सिंचन क्षेत्र वाढून रब्बी पिकांना लाभ होईल व पीक पद्धतीत बदल करणेही शक्य होईल.

➤ पूरक व्यवसायांना चालना : शेततळ्यात मत्स्यपालन (मासेमारी) किंवा बदकपालन यांसारखे पूरक व्यवसाय करता येतात, ज्यामुळे शेतकऱ्याला अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकतो.

भूजल पुनर्भरण : शेततळ्यातील पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.


क) लाभार्थी पात्रता निकष :-

➤ या बाबीचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील ७/१२ धारक असावा व अॅग्रीस्टॅक फार्मर रजिस्टरमध्ये नोंदणीकृत असावा.

➤ अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे किमान ०.४० हे. जमीन असावी, तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट ०.२० हेक्टर इतकी राहील. मात्र कमाल क्षेत्र धारण्याची मर्यादा नाही.


शेततळ्यासाठी जागा निवडीचे तांत्रिक निकष :-

❖ शेततळे खोडण्यासाठी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे.
❖ ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, अशी जमीन असलेल्या जागेची निवड करण्यात येईल. काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात येईल.
❖ मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यासाठी निवडू नये.
❖ ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण ३ टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळे घेण्यात यावीत. ३ टक्क्यांपेक्षा अधिक उताराच्या जमिनीवर शेततळे घेण्यात येऊ नये.
❖ नाल्याच्या/ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
❖ इनलेट/आउटलेट विरहित शेततळ्यासाठी पुनर्भरणाकरिता अतिरिक्त उपाययोजना उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात येईल.
❖ सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिखल होईल, तसेच शेततळ्यातून पाणी पाझरून लागवडीच्या शेतकऱ्याच्या स्थावर/जंगम मालमत्तेचे नुकसान होईल अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडण्यात येऊ नयेत.

➤ ज्या शेतकऱ्यांनी शेततळे खोडकामासाठी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना या घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील.


ड) लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया:-

१. सदर बाबीचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक राहील.
२. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जातून आर्थिक लक्षांकांच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येईल.
३. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी तालुका हा घटक म्हणून ग्राह्य धरला जाईल, तर अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग, तसेच दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा घटक म्हणून ग्राह्य धरला जाईल.
४. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून, त्यापैकी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी करतील.
५. तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रस्तावांना, तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत आवश्यक तांत्रिक/प्रशासकीय मान्यता/कार्यादेश देण्यात येईल.
६. शेततळे खोडकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर, संबंधित उप कृषी अधिकारी यांचेमार्फत स्थळ तपासणी करण्यात येईल.
७. स्थळ तपासणीच्या आधारे, तालुका कृषी अधिकारी अनुदान वितरणासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील.

कृषी समृद्धी योजनाGR PDF
  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme