Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Posted on March 18,March 18, by Mahasarkari Yojana

Gaay Mhais Yojana: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत येणारी दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे. या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला किती शेळी-मेंढीचे गट दिले जाणार आहेत, अर्ज कोण करू शकतो, त्याची निवड प्रक्रिया कशी असते, गटाची एकूण किंमत किती आहे, अनुदान किती मिळतं, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा, GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत — ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत. 👍

Contents hide
1 Gaay Mhais Yojana लाभाचे स्वरूप
2 लाभार्थी
3 लाभार्थी निकष –
4 Gaay Mhais Yojana पात्रता
5 गटाची किंमत
6 अनुदानाचे स्वरूप
7 Gaay Mhais Yojana आवश्यक कागदपत्रे
8 अटी व शर्ती
9 Gaay Mhais Yojana अर्ज कसा करावा
10 Related

Gaay Mhais Yojana लाभाचे स्वरूप

१) लाभार्थ्यांना ०१ दुधाळ गाय/ म्हैस व ३ वर्षांचा विमा
किंवा
२) लाभार्थ्यांना ०२ दुधाळ गाय/ म्हैस व ३ वर्षांचा विमा

लाभार्थी

सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट

लाभार्थी निकष –

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.

अ) भूमिहीन (फक्त १ गाय / म्हैस गटासाठी)
ब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
क) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
ड) वनहक्क धारक
इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)

वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच १ गाय / म्हैस गटासाठी महिलांना ५० टक्के आणि २ गाय / म्हैस गटासाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.

Gaay Mhais Yojana पात्रता

१) १ गाय/म्हैस साठी जमीनधारणेची आवश्यकता नाही.
२) २ गायी/म्हैस गटासाठी किमान १ एकर इतकी जमीन आवश्यक. मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.
३) २ गायी/म्हैस गटासाठी – पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)
किंवा
२ वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव

Sheli/Mendhi Palan Yojana: शेळी/मेंढी गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

गटाची किंमत

(१) १ गाय/ म्हैस रु. १,००,०००/- व विमा (रु १,१२,०३६/-)
किंवा
(२) २ गायी/म्हैस गट – २,००,०००/- व विमा (रु २,२४,०७२/-)

अनुदानाचे स्वरूप

१) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के
२) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के

Gaay Mhais Yojana आवश्यक कागदपत्रे

१) स्वतःच्या नावाचे ७/१२ उतारा किंवा किमान ५ वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा,
२) वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची “जे” प्रमाणपत्र,

३) पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र.)

किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र

किंवा
दुध संकलन किमान २ वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र

४) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
५) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र

Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

अटी व शर्ती

१) या योजनेंमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गाई, प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गाई तसेच, मुर्रा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येतील. वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या/तिसऱ्या वयातील असावीत.

२) पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी गठीत समिती समवेत दुधाळ गाय/म्हैस गटाची राज्य बाहेरून खरेदी करावी.

३) जर लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.

४) खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेंमध्ये निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच, दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावर वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावयाचा आहे.

५) वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविण्यात यावा.

६) योजनेंमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरविण्यात यावे.

७) तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.

८) योजनेंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखांनी करणे बंधनकारक राहील.

९) योजनेंच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना GR PDF

Gaay Mhais Yojana अर्ज कसा करावा

१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत.

३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे.

५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • Anmol Beti Yojana Jammu and Kashmir 2026: आवेदन, पात्रता, दस्तावेज पूरी जानकारी

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme