PM Gati Shakti Scheme in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री गती शक्ती योजना 2024 संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने देशात तरुणांच्या रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे धोरण केंद्र सरकारचे आहे. आज आपण या लेखात कायआहे ही प्रधानमंत्री गती शक्ती योजना, त्याचे उद्दिष्ट, पात्रता, फायदे, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज या लेखात पहाणार आहोत. जर तुम्ही ही देशातील बेरोजगार तरुण असाल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख नक्की संपूर्ण वाचा.
PM Gati Shakti Scheme in Marathi
या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही योजना आपल्या देशाची पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात या योजने संबंधित घोषणा केली होती. या योजनेद्वारे देशातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या भाषणात केलेल्या उद्दिष्टानुसार या योजनेचे एकूण बजेट १०० लाख कोटी निश्चित करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री गती शक्ती योजनेद्वारे आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या बांधणीत हा दृष्टिकोन स्वीकारला जाणार आहे, अशी माहिती प्रधानमंत्री दिली. या योजनेद्वारे पायाभूत सुविधा अंतर्गत योजनांची गती वाढवण्यासाठी काम केले जाणार आहे. यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील गती मिळणार आहे. तसेच देशातील वाहतूक साधनांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव आहे. या योजनेद्वारे डेडलॉक संपुष्टात येणार आहे.
मुद्रा योजना मराठी माहिती Apply Online Mudra Bank Loan form
प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे वैशिष्ट्य आणि फायदे कोणते?
- अत्याधुनिक नावीन्यपूर्ण आणि नवीन युगाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्याच्या गरजेवर भर जाणार आहे.
- १०० लाख कोटी रुपयांच्या या नवीन उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
- काही काळानंतर योजनेचा मास्टर प्लानही सर्वांसमोर मांडला जाईल.
- देशाच्या प्रत्येक भागात चालवले जाणारे प्रकल्प एकमेकांशी जोडले जातील.
- या योजनेद्वारे देशाचा विकास होईल आणि नागरिकांना रोजगार मिळेल.
- प्रधानमंत्री गती शक्ती योजनेअंतर्गत देश आपल्या उत्पादन उत्पादनांना अधिक प्रोत्साहन देईल.
- लघु आणि कुटीर उद्योगांचे उत्पादनही वाढेल.
- योजनेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक भागात नागरिकांना सहजपणे जीवन जगता यावे यासाठी वाहतूक सुविधा,वीज सुविधा, २४ तास पाण्याची सुविधा इत्यादी सुविधा पुरवल्या जातील.
- गती शक्ती योजनेअंतर्गत मेड इन इंडियाच्या सर्व उत्पादनांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल.
- भारतातील सर्व स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावरील स्पर्धक बनवले जाईल.
- पायाभूत सुविधांद्वारे वाहतुकीची साधने विकसित केली जातील.
- या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करणे.
- पायाभूत सुविधांच्या बांधणीत ही योजना एक समग्र दृष्टीकोन स्वीकारणे.
- देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणे उद्योगांची गती वाढ होणे.
- जागतिक स्थरावर स्थानिक उत्पादक उत्पादन स्पर्धात्मक बनवणे.
- पायाभूत सुविधांची पायाभरणी करणे.
या योजनेचे उद्दिष्ट देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे. पायाभूत सुविधांच्या अंतर्गत रोजगाराला चालना निर्माण करून देणे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारणे व स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवून देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे. जेणेकरून आपल्या देशातील उद्योग विकसित होतील आणि आर्थिक क्षेत्रे देखील विकसित केली जातील.
1. अर्जदार भारताचा रहिवासी असावा.
2. देशातील १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
3. देशातील बेरोजगार तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पात्र असेल.
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना(pm fme scheme)2021-2025
प्रधानमंत्री गती शक्ती योजना महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
- बँक खाते
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- इमेल आयडी
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला रे
- शन कार्ड
- वय प्रमाणपत्र
निशुल्क गॅस शेगडी कनेक्शन योजना (PMUY) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज
प्रधानमंत्री गती शक्ती योजनेची अर्ज प्रक्रिया काय असणार आहे?
ही योजना १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अजून सक्रिय केली गेलेली नाही. तसेच या योजनेसंदर्भात अर्ज स्वीकारण्यासाठी प्रणाली आणि त्याबद्दलची माहिती देखील अजून पर्यंत सरकारद्वारे प्रदान केली गेलेली नाही. या योजनेसंदर्भात अर्ज प्रक्रिया संबंधित माहिती सरकार मार्फत निर्गमित केल्यास ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत याच लेखामार्फत पोहोचू.
- Latest पीक विमा योजना GR अनुदान मंजूर! पहा कोणत्या हंगामासाठी किती कोटी अनुदान मंजूर!!
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना परीक्षा आणि प्रशिक्षण याबद्दल संपूर्ण माहिती
- प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान 187 कोटी वितरित
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Ladli Behna Yojana Online Apply Punjab Form 2024