शेततळे अनुदान योजना 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बियाणे वितरण योजना, कीड व्यवस्थापन योजना , अन्नद्रव्य व्यवस्थापन, वैयक्तिक शेततळे अनुदान योजना , पंप व पाईप संच अनुदान योजना याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजने अंतर्गत पम्प संच, वयक्तिक शेततळे, कृषी अवजारे, बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), या घटकांनाही अनुदान देण्यात येणार आहे त्याच्या अधिक महित्यी घेण्यासाठी खालील दस्तऐवज पहा.
केंद्र सरकार पुरस्कृत सन २००७-०८ पासून राज्यात अन्न सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेतीच्या लागवडीसाठी आवश्यक असणारी बियाणे पुरवणार आहे . बियाणे चांगल्या दर्जाचे असतील तर शेतीतून निघणारे उत्पन्न हि त्याच प्रतीचे असणार .त्यामुळे राज्य शाशनाने शेतकऱ्यांसाठी हि योजना काढली आहे.सन २०१८-१९ व २०१९-२० ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. यालाच अनुसरून सन २०१८-१९ पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वतंत्र अभियाने राबवली आहेत.
मागेल त्याला शेततळे योजना 2024 संपूर्ण माहिती
शेततळे अनुदान योजना 2024 पात्रता लक्ष्यात घेऊन पात्र असल्यास अर्ज करू शकता
केंद्र सरकारने वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी पीक पध्दत्तीनुसार या योजनेसाठी पीकनिहाय निवडलेले जिल्हे तपासण्यासाठी खालील माहिती वाचा आणि या योजनाईचा लाभ घ्या.
1) राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
2) राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
3) राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
4) राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
5) राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे)
अ) ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
ब) बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
क) रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
ड) कापूस- (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ.
(नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
इ) ऊस- (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड.
(लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.
वरील दिलेल्या जिल्ह्यानुसार अर्जदाराने अर्ज करावेत. अर्जदाराने लक्ष्यात घ्यावे कि कोणत्याही घटकासाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय असेल. ज्या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे ते पीक गळीत धान्य असो वा तेलबिया किंवा इतर पीक असो ते त्याच्या शेतात पीक असणे अनिवार्य आहे.
नोट :
या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती जमाती आणि इतर सर्व शेतकऱ्यांना घेता येईल याची नोंद घ्यावी. परंतु शासनाच्या नियम प्रणालीनुसार या अनुदानाचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर सर्व शेतकऱ्यांना असेल.
शेततळे अनुदान योजना 2024 कागदपत्रे
- शेतीचा ७/१२ प्रमाणपत्र
- शेतीचे ८-ए प्रमाणपत्र
- खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
- केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
- शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असल्यास जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शेतकऱ्याकडून हमीपत्र
- खरेदी करण्यापूर्वीच पूर्वसंमती पत्र.
वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2024 अर्ज
या सर्व गोष्टींसाठी पात्र असल्यास शेतकऱ्याने या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा निश्चित लाभ घ्यावा.अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.
- PIK नुकसान भरपाई फॉर्म 2024: पहा कोणत्या पिकाला हेक्टरी किती रुपये मिळणार पीक विमा?
- Solar Panel Yojana Maharashtra 2024 List
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती