नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘अहिल्यादेवी होळकर योजना’ तसेच ‘राजे यशवंतराव होळकर महामेश योजना 2024’ यासंदर्भात माहिती घेणार आहोत. या योजनेंतर्गत विविध 18 योजना (Sheli, Mendhi, Kukutpalan, Charai Anudan Yojana) राबवल्या जातात. यामध्ये शेळी-मेंढी वाटप योजना, जागा खरेदीसाठी अनुदान, कुकुटपालनासाठी अनुदान, आणि चराई अनुदान यांसारख्या योजनांचा समावेश आहे. या योजनांमधील अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे, आणि आज आपण या अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती घेणार आहोत.
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan 2024
महाराष्ट्रातील मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. यामध्ये ‘राजे यशवंतराव होळकर महामेश योजना‘ मध्ये शेळी-मेंढी वाटप योजना, मेंढ्यांसाठी चराई अनुदान, जागा खरेदी अनुदान, कुकुटपालन यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. एकूण 18 योजना या योजनेतर्गत आहेत.
या योजनांच्या अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे, आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत. शेवटची अर्ज करण्याची तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे. अर्जाची पावती आणि इतर कागदपत्रे सबमिट करण्याची सुविधा ही तारखेच्या नंतर उपलब्ध होईल.
योजना कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे ?
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्हे. (तथापि सन २०२४-२५ करिता महामेष योजने अंतर्गत घटक क्रमांक १ ते १३ करिता पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरिता लक्षांक नाही. तसेच घटका क्रमांक १४ व १५ करिता यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरिता लक्षांक नाही)
चराई अनुदान योजना
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्हे
शेळी मेंढी पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी योजना – राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्हे
परसातील कुकूट पालन योजना
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता, उर्वरित ३४ जिल्ह्यांमधील महागनगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व कटक मंडळे वगळून इतर भाग
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan पात्रता निकष
- अर्जदार 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचा असावा आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा.
- अर्जदार हा भटक्या जमाती (NTC) प्रवर्गातील असावा.
- एका कुटुंबातील एका व्यक्तीला फक्त अर्ज करण्याची परवानगी आहे.
- अपंगत्व असलेल्यांसाठी वेगळी सोय असून, त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
- मेंढ्या आणि कुक्कुटपालनासाठी अर्ज करताना अर्जदाराकडे योग्य प्रमाणात पशुधन असणे आवश्यक आहे.
Mahamesh योजनेसाठी कोण पात्र नाही ?
- राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
- वर्षापेक्षा कमी व ६० वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतींनिधी या योजनेकरिता पात्र नाही
- ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस या आधी “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने” अंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने” मध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही. तथापि इतर ३ योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र असेल.
- स्व:मालकीची किमान एक गुंठा जागा नसलेले व्यक्ती “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने” मधील घटक क्रमांक १, ८, १० व १५ मध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
- स्वत:च्या २० पेक्षा कमी मेंढ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांना “मेंढ्याकरिता चराई अनुदान” या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही.
- ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन आहे अशा मेंढपाळ कुटुंबातील कोणतेही सदस्य “शेळी-मेंढी पालानासाठी जागा खरेदी अनुदान” या योजनेचा अर्ज करण्यास पात्र नाहीत.
- राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत व कटक मंडळामधील व्यक्तीस “कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपानाकरिता अनुदान” या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही.
बचतगट व शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्या योजनेकरिता पात्र ?
भटक्या-जमाती (भ-जक) प्रवर्गातील सदस्य असलेल्या बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) फक्त महामेष योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र आहे.
अर्जदार कोणत्या घटकांसाठी एकत्रितरीत्या अर्ज करू शकतो?
1) राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत (घटक १-१५ करिता) पहिल्या दोन घटकामधील कोणत्याही एका घटकाचा किंवा घटक क्रमांक १४ व १५ या पैकी कोणत्याही एका घटकाचा लाभ घेतल्यास त्यांना महामेष योजनेतील इतर घटकांमध्ये लाभ घेता येणार नाही.
2) राजे यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत (घटक १-१५ करिता) अर्जदाराने घटक क्रमांक ३ ते ७ या मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेतल्यास त्यांना महामेष योजनेतील पहिले २ घटक वगळता उर्वरित घटकांमधील घटक क्रमांक ८ ते ११ मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेता येईल, तसेच घटक क्रमांक १२ व १३ मधील कोणत्याही एका घटकाचा लाभ घेता येईल.
3) मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजने अंतर्गत किमान २० मेंढया व १ मेंढानर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल.
4) मेंढी – शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजने अंतर्गत भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ घेता येईल.
5) कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजने साठी अर्जदार हा महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद / कटक मंडळे / नगरपंचायत चा रहिवासी नसावा.
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan कागदपत्रे
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रेशन कार्ड क्रमांक
- बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan 2024 Online Form
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महामेश वेबसाइट वर जावे लागेल. अर्ज भरण्यासाठी आवश्यक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये खालील गोष्टींची काळजी घ्या:
- वेबसाईट लिंक: महामेश वेबसाइट
- अर्ज ऑनलाईन आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे भरता येईल.
- अर्ज भरण्याआधी सूचनांचे वाचन करा.
- वैयक्तिक माहिती भरताना अनिवार्य माहिती तंतोतंत द्या.
- आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी नमुने उपलब्ध आहेत.
- आधार कार्ड, रेशन कार्ड क्रमांक, वय, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, IFSC कोड इत्यादी माहिती अचूक भरा.
- अर्जदाराची माहिती भरल्यानंतर सबमिट करा ऑप्शनवर क्लिक करा.
Ahilyadevi Yoajan Mahamesh Yoajan महत्वाच्या तारखा
अर्जाची अंतिम तारीख: | 26 सप्टेंबर 2024 |
प्राथमिक निवड यादी: | 30 सप्टेंबर 2024 |
कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख: | 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2024 |
अंतिम निवड यादी: | 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 |
तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, वरील माहितीचा नीट अभ्यास करा आणि अर्ज करण्यापूर्वी सगळ्या निकषांची पूर्तता तपासा. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. योजनेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी नियमानुसार अर्ज करून शासकीय लाभांचा फायदा घ्यावा.
FAQs
नोंदणी कशी करायची ?
- https://mahamesh.org हा पोर्टल ओपन करा.
- टॉप बार मध्ये अर्ज करा या मेनू वर क्लिक करा.
- नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून नोंदणी करू शकतो.
या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना मिळू शकेल?
- ही योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू आहे.
- लाभार्थी निवडीचे निकष कोणते आहेत?
- लाभार्थी १८ ते ६० वर्षांच्या वयोगटातील असावा.
- महिलांसाठी ३०% आणि दिव्यांगांसाठी ३% आरक्षण आहे.
- लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी महामेष योजनेचा लाभ घेतला नसावा.
नियमित सूचना आणि अपडेट्स कसे पहावेत ?
- https://mahamesh.org हा पोर्टल ओपन करा.
- टॉप बार मध्ये मुख्यपृष्ठ या मेनू वर क्लिक करा.
- इथे सूचना या सेक्शन मध्ये अपडेट्स पाहू शकता.
लॉगिन कसे करावे ?
- https://mahamesh.org हा पोर्टल ओपन करा.
- अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड नि लॉगिन करू शकतो.
- जर अर्जदार आपला पासवर्ड विसरला तर पासवर्ड विसरलात या वर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर भरून पासवर्ड बदलू शकतो.
पासवर्ड विसरल्यास काय करावे ?
- https://mahamesh.org हा पोर्टल ओपन करा.
- टॉप बार मध्ये अर्ज करा या मेनू वर क्लिक करा.
- नंतर अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड नि लॉगिन करा.
- केलेले अर्ज वर ‘पासवर्ड विसरलात?’ हा पर्याय निवडा.
- तुमचा पासवर्ड हा तुमच्या आधार / बचत गट / FPO नंबर चे शेवटचे ३ क्रमांक व मोबाईल नंबर चे शेवटचे ३ क्रमांक असेल.
- आधारकार्ड / बचत गट / FPO क्रमांक प्रविष्ट करा. पासवर्ड फील्ड मध्ये पासवर्ड लिहा आणि नवीन पासवर्ड सेट करा.
संपर्क
संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा
ई-मेल – mahameshyojana2024@gmail.com
दुरध्वनी – 020 2565 7112
दुरध्वनी (10AM to 7PM) – 8308584478
योजने बदल अधिक माहिती व संपर्क (10AM to 6PM) – 1962
महामेष पोर्टल आणि मोबाईल अप्लिकेशन वापरा संबंधित तांत्रिक अडचणी आल्यास कृपया खालील ई-मेल वर आपला मोबाईल क्रमांक , आधार क्रमांक या सह संपर्क करावा (10AM to 7PM) – mahameshtechhelp@gmail.com- 8308584478
जर तुम्ही वेबसाईटवर नवीन असाल, तर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टेलीग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला फॉलो करा.
- Maharashtra Berojgari Bhatta Yojana 2024 ऑनलाईन रजिस्ट्रेशन
- महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना मान्यता शासन निर्णय
- अर्ज सुरु फळबाग/ बांबू लागवड (पोखरा) योजना । Last Date किती?
- Pandit Dindayal Yojana Apply 2024 Form: स्वयम हॉस्टेल स्कॉलरशिप योजना
- Apang Yojana: महाराष्ट्रातील 3 दशलक्ष दिव्यांगांना सक्षम बनवणारा क्रांतिकारक कार्यक्रम