e-Shram Card e-KYC: नमस्कार मित्रांनो, ई-श्रम कार्ड असंघटित कामगारांसाठी आहे, आणि बऱ्याच जणांनी ई-श्रम कार्ड काढलेले आहे. परंतु, अनेकांनी अजून ई-केवायसी केलेली नाही. ई-श्रम कार्डची ई-केवायसी कशी करायची? या पोस्टमध्ये मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे, तर हि पोस्ट नक्की शेवटपर्यंत वाचा.
e-Shram Card e-KYC Update Process स्टेप बाय स्टेप
1 Step: ई-श्रम वेबसाईटवर जा
मित्रांनो, ई-श्रम कार्डची केवायसी करण्यासाठी तुम्हाला “https://eshram.gov.in/” या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईट उघडल्यावर, तुम्हाला उजव्या बाजूला “रजिस्टर ऑन ई-श्रम” हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
2 Step: ई-श्रमवर रजिस्टर करा
रजिस्टर ऑन ई-श्रमवर क्लिक केल्यानंतर, नवीन विंडो उघडेल जिथे तुम्हाला “ऑलरेडी रजिस्टर” हा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा.
3 Step: आधारचा वापर करून प्रोफाइल अपडेट करा
ऑलरेडी रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर, पहिला ऑप्शन “अपडेट प्रोफाइल युजिंग आधार” दिसेल. त्यावर क्लिक करा. आधार ऑप्शनवर क्लिक केल्यावर, तुम्हाला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर विचारला जाईल. तो मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा टाकून “सेंड ओटीपी” वर क्लिक करा.
E Shram Card Ka Paisa Kaise Check Kare ? E Shram Card Check Balance जानिए स्टेप बाइ स्टेप
4. Step: ओटीपी टाका आणि सत्यापन करा
त्यानंतर, आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी भरून सबमिट करा. आधार नंबर टाकून ओटीपी सिलेक्ट करा. कॅप्चा भरून सबमिट केल्यानंतर, तुमच्या मोबाईलवर आणखी एक ओटीपी येईल. ओटीपी टाका आणि व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा.
5 Step: वैयक्तिक माहिती तपासा
व्हॅलिडेट केल्यानंतर, आधारशी संबंधित तुमची वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल. लक्षात ठेवा, चुकीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यास तुमचं ई-श्रम कार्ड बंद होऊ शकतं, त्यामुळे योग्य ऑप्शन निवडा.
6 Step: प्रोफाइल आणि बँक डिटेल्स अपडेट करा
तुमच्यासमोर तीन ऑप्शन दिसतील – “अपडेट प्रोफाइल,” “डाउनलोड युएन कार्ड,” आणि “फाइंड एलिजिबल स्कीम.” या प्रोसेसमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, शिक्षण, उत्पन्न माहिती, व्यवसाय, कौशल्य आणि बँक खात्याची माहिती अपडेट करता येईल. बँक खात्याची माहिती अपडेट करताना, बँक सीडिंग विथ आधार यस असणं महत्त्वाचं आहे.
7 Step: सर्व माहिती कन्फर्म करा आणि KYC पूर्ण करा
सर्व माहिती भरल्यानंतर, कन्फर्म करा आणि अपडेट करा. यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
8 Step: ई-श्रम कार्ड डाउनलोड करा
आता, ई-श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी, “डाउनलोड युएन कार्ड” या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचं ई-श्रम कार्ड डाउनलोड होईल आणि सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
तर अशा पद्धतीने, तुम्ही ई-केवायसी पूर्ण करून ई-श्रम कार्ड डाउनलोड करू शकता.
- 50% सबसिडी समाजकल्याण शिक्षण कर्ज योजना संपूर्ण माहिती | LIDCOM Education Loan Scheme
- Chiranjeevi Yojana पूरी जानकारी। मुख्यमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना राजस्थान
- प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजना शासन निर्णय
- Kali Bai Scooty Yojana Rajasthan Online Application 2025 पूरी जानकारी
- महास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र: ऑनलाइन अर्ज(rojgar.mahaswayam.gov.in)