Gaay Mhais Yojana (Dairy Farming Subsidy Scheme Maharashtra): मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना (Livestock Entrepreneurship Scheme) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत येणारी दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 (Dairy Farming Business Plan India) ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे. या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला किती दुधाळ जनावर गट (Dairy Farming Unit Maharashtra) दिले जाणार आहेत, अर्ज कोण करू शकतो (Apply Online Dairy Farming Scheme), त्याची निवड प्रक्रिया कशी असते, गटाची एकूण किंमत किती आहे (Dairy Farming Project Cost India), अनुदान किती मिळतं (Subsidy Scheme Maharashtra), कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा (Online Apply Process), GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत — ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत. 👍
Gaay Mhais Yojana लाभाचे स्वरूप (Dairy Farming Benefits & Milk Production Business)
१) लाभार्थ्यांना ०१ दुधाळ गाय/ म्हैस व ३ वर्षांचा विमा (Cow Buffalo Insurance Scheme India)
किंवा
२) लाभार्थ्यांना ०२ दुधाळ गाय/ म्हैस व ३ वर्षांचा विमा (Dairy Farming Investment with Insurance)
लाभार्थी (Target Beneficiaries Dairy Farming Scheme)
सर्व प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक व महिला बचत गट (SHG Loan Scheme Dairy Farming)
लाभार्थी निकष (Beneficiary Selection Criteria Dairy Farming Subsidy)
सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
अ) भूमिहीन (फक्त १ गाय / म्हैस गटासाठी)
ब) अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत भूधारक)
क) अल्प भूधारक (१ ते २ हेक्टरपर्यंत भूधारक)
ड) वनहक्क धारक
इ) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते ड मधील)
वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के तसेच १ गाय / म्हैस गटासाठी महिलांना ५० टक्के आणि २ गाय / म्हैस गटासाठी ३० टक्के आरक्षण लागू राहील.
Gaay Mhais Yojana पात्रता (Eligibility Criteria Dairy Farming Business)
१) १ गाय/म्हैस साठी जमीनधारणेची आवश्यकता नाही (Small Dairy Farming Business)
२) २ गायी/म्हैस गटासाठी किमान १ एकर इतकी जमीन आवश्यक (Dairy Farm Land Requirement India). मात्र वनहक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही.
३) २ गायी/म्हैस गटासाठी – पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (Dairy Farming Training Certificate) (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)
किंवा
२ वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव (Milk Business Experience India)
गटाची किंमत (Dairy Farming Project Cost & Investment India)
(१) १ गाय/ म्हैस रु. १,००,०००/- व विमा (रु १,१२,०३६/-) (Cow Buffalo Cost with Insurance)
किंवा
(२) २ गायी/म्हैस गट – २,००,०००/- व विमा (रु २,२४,०७२/-) (Total Dairy Farming Investment Cost India)
अनुदानाचे स्वरूप (Dairy Farming Subsidy Maharashtra)
१) सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के (50% Subsidy Dairy Scheme)
२) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के (75% Subsidy SC/ST Dairy)
Gaay Mhais Yojana आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Dairy Farming Loan & Subsidy)
१) स्वतःच्या नावाचे ७/१२ उतारा किंवा किमान ५ वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा (Land Proof for Dairy Loan),
२) वनहक्क जमीन धारकांसाठी ७/१२ उताऱ्यावर “इतर अधिकार” मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची “जे” प्रमाणपत्र,
३) पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय /निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (Dairy Farming Training Certificate) (अर्ज करतांना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमी पत्र.)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र
किंवा
दुध संकलन किमान २ वर्ष दूध विक्री करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (Milk Supply Proof)
४) दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र
५) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
अटी व शर्ती (Terms & Conditions Dairy Farming Scheme)
१) या योजनेंमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गाई, प्रतिदिन ८ ते १० लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गाई तसेच, मुर्रा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येतील. वाटप करावयाची दुधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या/तिसऱ्या वयातील असावीत.
२) पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी गठीत समिती समवेत दुधाळ गाय/म्हैस गटाची राज्य बाहेरून खरेदी करावी.
३) जर लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.
४) खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेंमध्ये निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे. तसेच, दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावर वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करावयाचा आहे.
५) वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविण्यात यावा.
६) योजनेंमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरविण्यात यावे.
७) तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याचा खरेदी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्याचे बँकेचे तपशील, विमा) जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना सादर करावा.
८) योजनेंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहे त्या संस्थेच्या संस्थाप्रमुखांनी करणे बंधनकारक राहील.
९) योजनेंच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याकडून घेण्यात यावे.
Gaay Mhais Yojana अर्ज कसा करावा? (Apply Online Dairy Farming Scheme Maharashtra)
१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत.
३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे.
५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.
- Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
- POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
- सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
- Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती