नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २७ सप्टेंबर २०२१ रोजीचा शासन निर्णय माहिती पाहणार आहोत. हि योजना २००५-०६ पासून कार्यन्वयित करण्यात आली आहे. शेती व्यवसाय करताना होणारे अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकाराव लागत. अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठी हि योजना काढली गेली होती , जेणेकरून अश्या गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल. हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्टय आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो त्याची करणे वेगवेगळी असू शकतात . जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती , पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता , महाराष्ट्र सरकारने हि योजना २००५-०६ सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता २०१५-१६ मध्ये हि रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय GR
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा हप्ता अदा केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीमार्फत व ऑक्सालियम इन्शुरन्स ब्रेकिंग प्रायव्हेट लिमिटेड या विमा सल्लागार कंपनीमार्फत शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०२१ रोजी मान्यता देण्यात आली होती.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण माहिती
आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रधान झाल्यापासून बारा महिन्याच्या कालावधीकरिता राज्यातील सर्व खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य यांना वेगवेगळ्या अपघातांत पासून संरक्षण देण्याकरिता विमा कंपनीला आणि विमा सल्लागार कंपनीला कार्यालयीन खर्चासाठी मंजूर करण्यात आलेली रक्कम व पहिल्या सहा महिन्यासाठी देऊ केलेली विमा हप्ता रक्कम आणि विमा ब्रोकरेज रक्कम त्याच प्रमाणे दुसऱ्या सहा महिन्यासाठी द्यावयाची हप्ता रक्कम यांचा सविस्तर तपशील खाली दिलेल्या तक्त्यामध्ये दर्शविलेला आहे

वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे उरलेल्या सहा महिने कालावधीकरिता निश्चित होणारी एकूण विमा रक्कम ही रुपये ४४ कोटी १८ लाख ६४ हजार विमा कंपनी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी आयुक्त यांना वितरित करण्यात आलेली आहे. असा हा शासन निर्णय दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेला आहे.
- ITI स्टायपेंड योजना माहिती | ITI Stipends Scheme Maharashtra
- महाराष्ट्रातील पात्र जोडप्यांना ₹50,000 पर्यंत विवाह प्रोत्साहन Matrimonial Incentives Scheme
- Mukhyamantri Alpsankhyak Udyami Yojana 2025: ऑनलाइन आवेदन शुरू| ₹10 लाख रुपए लोन पर ₹5 लाख माफ़
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण मराठी माहिती
- कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.