Skip to content

महासरकारी शेतकरी योजना

सरकारी योजना महाराष्ट्र 2026

येथे योजना लिहून शोधा

Menu
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • आमच्याबद्दल
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • संपर्क
Menu

Kukkut Palan Yojana: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Posted on March 18,March 22, by Mahasarkari Yojana

Kukkut Palan Yojana (Poultry Farming Subsidy Scheme Maharashtra): मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना उद्योजकता योजना (Livestock Entrepreneurship Scheme) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत येणारी अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप योजना (Poultry Farming Business Plan India) ही ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप उपयोगाची योजना आहे. या ब्लॉगपोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला किती अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट / देशी पक्षांचे वाटप केले जाणार आहेत, अर्ज कोण करू शकतो (Apply Online Poultry Farming Scheme), त्याची निवड प्रक्रिया कशी असते, गटाची एकूण किंमत किती आहे (Poultry Farming Project Cost India), अनुदान किती मिळतं (Subsidy Scheme Maharashtra), कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा (Online Apply Process), GR PDF आणि अटी व शर्ती काय आहेत — ही सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत इथे सविस्तर समजावून सांगणार आहोत.

Contents hide
1 लाभाचे स्वरूप:
2 Kukkut Palan Yojana लाभार्थी((Target Beneficiaries Poultry Farming Scheme))
3 लाभार्थी निवड (Beneficiary Selection Process Poultry Farming Subsidy)
3.1 पात्रता (Eligibility Criteria Poultry Farming Business)
3.2 घटकाची किंमत (Poultry Farming Project Cost & Investment India)
3.3 Kukkut Palan Yojana अनुदानाचे स्वरूप (Poultry Farming Subsidy Maharashtra)
4 आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Poultry Farming Loan & Subsidy)
4.1 अटी व शर्ती (Terms & Conditions Poultry Farming Scheme India)
4.2 Government Resolution Poultry Scheme PDF
4.3 Kukkut Palan Yojana अर्ज कसा करावा (Apply Online Poultry Farming Scheme Maharashtra)
4.4 Related

लाभाचे स्वरूप:

अंडी देणाऱ्या १६ – १८ आठवडे वयाच्या ५०० सुधारित / देशी कुक्कुट पक्षी (Layer Poultry Farming Business), अर्धछंदिस्त / पिंजरा / गादी पद्धतीने जोड, खाद्य, पाणी भांडी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एग नेस्ट इत्यादी आवश्यक साहित्य (Poultry Farming Setup Cost India)

Gaay Mhais Yojana: दुधाळ जनावर गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Kukkut Palan Yojana लाभार्थी((Target Beneficiaries Poultry Farming Scheme))

सर्व प्रवर्गातील लाभार्थी

लाभार्थी निवड (Beneficiary Selection Process Poultry Farming Subsidy)

सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमाने करण्यात येईल.
अ) भूमिहीन
ब) अत्यल्प भूधारक
क) अल्प भूधारक
ड) महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. अ ते क मधील)
वरील घटकांमध्ये दिव्यांगासाठी ५ टक्के तसेच महिलांना ५० टक्के आरक्षण लागू राहील.

Aajeevika Micro-Finance Loan Scheme | उद्योजक कर्ज योजना संपूर्ण माहिती

पात्रता (Eligibility Criteria Poultry Farming Business)

कुक्कुट व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील)
किंवा
२ वर्षाचा कुक्कुट व्यवसायाचा अनुभव

घटकाची किंमत (Poultry Farming Project Cost & Investment India)

१) पक्षी किंमत – किमान १५० ते २०० अंडी उत्पादन देणारे ५०० पक्षी रु. ३५०/- प्रति पक्षी प्रमाणे
२) २ महिन्याच्या खाद्यावरिल खर्च (१.२ कि.ग्रॅ. प्रति पक्षी x रु. २५/- प्रति कि.ग्रॅ. प्रमाणे)
३) अर्धछंदिस्त / पिंजरा / गादी पद्धतीने संगोपन (प्रति पक्षी रु. १००)
४) खाद्य, पाणी भांडी, अंडी ठेवण्यासाठी ट्रे, एग नेस्ट इत्यादी आवश्यक साहित्य (प्रति पक्षी रु. २०/-)

एकूण किंमत रु. ३,३२,२००/- (Total Poultry Farming Investment Cost India)

Sheli/Mendhi Palan Yojana: शेळी/मेंढी गट वाटप योजना 2026 | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

Kukkut Palan Yojana अनुदानाचे स्वरूप (Poultry Farming Subsidy Maharashtra)

१. सर्वसाधारण लाभार्थी – ५० टक्के (50% Subsidy Scheme)
२. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी – ७५ टक्के (75% Subsidy SC/ST)

आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Poultry Farming Loan & Subsidy)

१) कुक्कुट व्यवसायाचे शासकीय / निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (Poultry Farming Training Certificate) (अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबत हमी पत्र.)
किंवा
स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र
२) दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र
३) बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र (SHG Loan Eligibility Proof)

अटी व शर्ती (Terms & Conditions Poultry Farming Scheme India)

१) या योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणारे कुक्कुट पक्षी हे वार्षिक किमान १५० ते २०० अंडी उत्पादन देणारे व १६ ते १८ आठवडे वयोगटातील असावेत.
२) देशी पक्षी खरेदी करताना प्राधान्याने शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र / संघन कुक्कुट गट / सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रकल्प / राष्ट्रीय पशुधन अभियान / स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प यांच्याकडून घेण्यात यावे.
३) पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच एक महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी कुक्कुट पालनासाठी शेडची उभारणी करावी.
४) देण्यात आलेल्या एक महिन्याच्या कालावधीत पक्षी, खाद्य/पाण्याचे भांडे तसेच इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुक्कुट पालन सुरू करावे.
५) लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालावधीत कुक्कुट पक्षी खरेदी न केल्यास असा लाभार्थी नाव मूळ प्रतीक्षा यादीतील वेटिंग क्रमांकावर ठेवण्यात येऊन, पुढील प्रतीक्षायादीतील लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल.

महिला कर्ज योजना 2026: Stand-Up India Loan Scheme व्याज दर, पात्रता

६) प्रकल्प सुरू झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करून तपासणी अहवाल (खरेदी पावती, छायाचित्रे, लाभार्थ्यांचे बँकेचे तपशील) जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना १५ दिवसात सादर करावा (Verification Process Poultry Farming Subsidy).
७) योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करावयाची आहे (Extra Investment Cost).
८) योजनेंच्या अटी/शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्यांकडून घेण्यात यावे (Agreement for Subsidy Scheme).

Government Resolution Poultry Scheme PDF

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना GR PDF

Kukkut Palan Yojana अर्ज कसा करावा (Apply Online Poultry Farming Scheme Maharashtra)

१) सदर योजनासाठी लाभार्थी निवडताना जिल्हानिहाय सर्वसाधारण/अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गाची लोकसंख्या विचारात घेऊन लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

२) योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत (Online Application Process).

३) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीमार्फत यादृच्छिक (Random) पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे (Selection Process Online).

४) अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या-त्या वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही, अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षाधीन ठेवले जाणार आहे (Waiting List System).

५) संबंधित योजनांसाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागविले जाणार आहेत. मात्र मागील आर्थिक वर्षात प्रतीक्षाधीन असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे (Priority Applicants).

६) संबंधित भागाचा समूह स्वरूपात (Cluster Development Poultry Farming) विकास होईल यासाठी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत त्या-त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन क्लस्टर निश्चित केले जाणार आहे.

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती

Related

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Follow Us

आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करा

Recent Posts

  • Maiya Samman Yojana Swaghoshana Patra Download | मुख्यमंत्री मैया सम्मान योजना स्वघोषणा पत्र डाउनलोड
  • POCRA 2.0: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 संपूर्ण माहिती
  • Ladki Bahin Yojana Online Apply Link । Nari Shakti Doot App Download
  • सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
  • Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
  • जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
  • मुख्यमंत्री मैया सम्मान योजना फॉर्म डाउनलोड | Maiya Samman Yojana Form PDF Download
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2026: 30 जून 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय
  • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2026: PMMVY ऑनलाइन अर्ज करा
  • Assam Rifles Recruitment 2026 Online Apply Date, Age, Syllabus Details

Categories

  • Assam
  • Bihar Yojana
  • Blog
  • Chhattisgarh Yojana
  • Delhi Scheme
  • Haryana Yojana
  • Himachal Pradesh Yojana
  • Hindi Jankari
  • Jamin Update
  • Jammu and Kashmir Scheme
  • Jharkhand Yojana
  • Loan Scheme
  • Madhya Pradesh Yojana
  • Mahadbt Farmer Scheme List
  • Odisha Yojana
  • Pradhan Mantri Shetkari Yojana
  • Punjab Yojana
  • Rajasthan Yojana
  • Recruitment 2026
  • Tamil Nadu Scheme
  • Uncategorized
  • Uttar Pradesh Yojana
  • अपंग कल्याण योजना
  • अर्ज कसा करावा
  • अल्पसंख्यक कार्य मंत्रालय योजना
  • आदिवासी विकास विभाग योजना 2026
  • कृषी योजना महाराष्ट्र
  • केंद्र सरकार योजना
  • जिल्हा परिषद योजना
  • पिक व्यवस्थापन
  • पीएम योजना 2026
  • पोकरा योजना महाराष्ट्र
  • बातम्या
  • मराठी माहिती
  • महाराष्ट्र कृषी जीआर
  • महाराष्ट्र सरकार जीआर
  • महिलांसाठी योजना
  • समाज कल्याण योजना महाराष्ट्र
  • समाज कल्याण विभाग शासन निर्णय GR
  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • संपर्क
©2026 महासरकारी शेतकरी योजना | Design: Newspaperly WordPress Theme