Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF: नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजना त्या संबंधित जे हमीपत्र आहे त्याचा पीडीएफ तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली योजना आहे जी की राज्यभरातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्दिष्टाने राबवली जात आहे. ही योजना महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य व पोषण वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील एक निर्णय भूमिका मजबूत मजबूत करण्यासाठी राबवली जात आहे.
अर्ज प्रक्रिया काय आहे
21 ते 61 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. योजनेची नोंदणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये लक्षणीय गर्दी दिसून येताना आपण पाहिले आहे. पात्र महिला लेखामध्ये खाली दिलेल्या लिंक वरून कर्जाची पीडीएफ डाऊनलोड करू शकता आणि सेतू केंद्र तहसील कार्यालय किंवा नारीशक्ती त्यांचे अर्ज आहेत ते ऑनलाईन देखील सबमिट करू शकता.
या योजनेचा लाभ काय
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. जी त्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जर ते आधीच दीड हजार पेक्षा कमी रकमेच्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर फरक या योजनेअंतर्गत कव्हर केला जाणार आहे.
मुख्यंमत्री माझी लाडकी बहीन योजना मुदतवाढ आणि या अटी झाल्या रद्द
कोण यासाठी अर्ज करू शकतो?
- महाराष्ट्राची रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना देखील ही योजना लागू आहे.
- अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आहे अडीच लाखांपेक्षा जास्त असून नये.
लाभ कुणाला दिला जाणार नाही
- अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- आयकर दाता असलेले कुटुंबे देखील या योजनेपासून लाभ घेऊ शकणार नाहीत.
- कायमस्वरूपी आणि कंत्राटी सरकार कर्मचारी यांना देखील लाभ दिला जाणार नाही.
- इतर सरकारी योजनांमधून आधीच दीड हजार पेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या महिलांना या योजनातून लाभ मिळणार नाही.
- त्याचप्रमाणे खासदार आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ नाही.
- पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असलेली कुटुंब देखील या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत.
- नोंदणीकृत चार चाकी वाहने असलेली कुटुंब त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाहीत.
माझी लाडकी बहिन योजना अर्ज सुरु!! पहा महत्वाच्या तारखा!!
Ladki Bahini Yojana Documents Marathi
- अर्ज
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/जन्म दाखला
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
- बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
माझी लाडकी बहीण योजना Online Apply : पात्रता, लाभ व अर्ज प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download
अर्जाची पीडीएफ आणि हमी पत्राची पीडीएफ खाली दिलेली आहे खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही तिथून हमीपत्र डाऊनलोड करून घेऊ शकता आणि सविस्तरपणे अर्ज भरून अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला जमा करता येणार आहे. त्याचप्रमाणे जर तालुका पातळीवर तुम्ही नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेकडे हा अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे.
- Panjabrao Dakh कोण आहेत? त्यांचा हवामान अंदाज कसा काय खरा ठरतो?
- Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र अर्थसंकल्पातील सर्व महत्वपूर्ण योजना माहिती
- Gopal Credit Card Registration 2025: ऐसे भरें फॉर्म और पाएं 1 लाख रुपये
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 आली!! आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार!! अर्थसंकल्प 2025
- वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2025 माहिती: Rashtriya Anna Suraksha Yojana